Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांची युरीयासाठी भटकंती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरची, दि. 3 सप्टेंबर :  तालुक्यातील मुख्य पिक म्हणजे भात पिक. सध्या भातपीक गर्भावस्थेत असल्याने व मागील तीन – चार दिवसापासून तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने भात पिकाला युरिया खताची नितांत गरज आहे.

मात्र १५ ऑगस्ट पासून अद्यापही युरिया खताचा पुरवठा या तालुक्याला झालेला नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. व युरिया खत मुरतोय कुठे असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. परिणामी तालुक्यात खत मिळत नसल्याने हवालदील झालेला शेतकरी मिळेल त्या भावात व मिळेल त्या ठिकाणी युरीयासाठी भटकंती करीत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सविस्तर वृत्त असे  की, मागील आठवड्यात RCF या कंपनीचा युरिया व सुफला १५.१५.१५. असा मिक्स पुरवठा गडचिरोली जिल्ह्याकरिता करण्यात आला. आणि लगेचच फक्त युरिया या खताचा पुरवठा देखील RCF कडून करण्यात आला.

मात्र असे असताना देखील कोरची तालुक्याला अद्यापही युरिया खताचा पुरवठा करण्यात आलेला नाही. मागील वर्षी कोरची तालुका हा दुष्काळग्रस्त होता. दीड वर्षापासुनचे कोरोना महामारीचे संकट आणि यावर्षी खोडकिडा, गादमाशी व करपा असे तिहेरी अस्मानी संकट शेतकऱ्यांना झेलावे लागत असतानाच आता युरिया या अत्यावश्यक खतासाठी साठी देखील शेयकर्यांना भटकंती करावी लागत असल्याने येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे या गंभीर बाबीची दखल कृषी विभागाने घेणे गरजेचे झाले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

गडचिरोली जिल्ह्यात 144 कलम लागू

वाढदिवसाच्या दिवशी तलवारी घेऊन फोटो काढत भाईगिरी करने व त्याला व्हाट्सएप वर वायरल करने दोन युवकाला भोवले

गडचिरोली जिल्ह्यात 793 तपासण्यांपैकी 2 कोरोना बाधित तर 5 कोरोनामुक्त

 

Comments are closed.