Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारतीय संरक्षण मंत्रालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विदय़ापीठ यांच्यात सामंजस्य करार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

पुणे, दि. ३ सप्टेंबर :  ऐतिहासिक अशा सावित्रीबाई पुणे विदयापीठाशी भारतीय संरक्षण विभाग जोडल्याने सैन्य दलात येऊ पाहणा-या तरुणांना भारतीय सैन्य दलाचा खरा इतिहास कळेल अस मत संरक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव मयांक तिवारी यांनी व्यक्त केले .

भारतीय सैन्य दलात येणा-या तरुणांना भारतीय सैन्य दलाचा सखोल आणि खरा इतिहास कळावा याकरता भारतीय संरक्षण मंत्रालय, सावित्रीबाई फुले पुणे विदय़ापीठाच्या संरक्षण, सामरीकशास्त्र विभाग य़ांच्यात चेअर आँफ एक्सलेन्स साठी आज सामंजस्य करार करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी कुलगुरु नितीन कळमळकर,संरक्षण विभागाचे संयुक्त सचिव मयांक तिवारी, आदी मान्यवर उपस्थित होते. याच पुणे शहरात सदन कमांड सारखी मोठी संस्था असुन पुणे शहराला एक क्रांतीकारकाची पार्श्वभुमी आहे. त्यामुळे हा सामजंस्य करार महत्वाचा ठरत आहे. अस मत मयांक तिवारी यांनी व्यक्त केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या कामाकरता संरक्षण विभागाच्यावतीने दोन कोटी रुपयांचा विशेष निधी विदयापीठाकडे यावेळी सुपुर्द करण्यात आला. तीनही दलांचा इतिहास हा संदर्भासहित दिला जाणार असुन भारतातील विविध इतिहास संशोधन मंडळाचे सहाय्य या कामाकरता घेतले जाणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमारातील युध्दनीती पासुन ते पायदळच्या माध्यमातुन केलेली युध्दे,रणिनिती,गनिमीकावे याचीही माहिती सादर केली जाणार आहे. अस कुलगुरु नितीन कळमळकर यांनी यावेळी सांगितले.

हे देखील वाचा :

बीड : तालखेड येथील तरुणाचा बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

धुळ्यातील भूषण संजय पाटील या तरुण दिग्दर्शकाला आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटाचा मानांकन

वाढदिवसाच्या दिवशी तलवारी घेऊन फोटो काढत भाईगिरी करने व त्याला व्हाट्सएप वर वायरल करने दोन युवकाला भोवले

 

 

Comments are closed.