Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तब्बल १३ लाख किंमतीचा मुद्देमाल केला लंपास ! दिवाळी आधी गिफ्टच्या दुकानात चोरी !

विष्णूनगर पोलिसांनी आरोपीस केले जेरबंद !

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क : 

मुंबई डेस्क, दि. ३ नोव्हेंबर:  डोंबिवली दीनदयाळ रोडवर रुई कलेक्शन या गिफ्ट च्या दुकानात
आरोपी अजिंक्य वणारसे याने तब्बल १३ लाख रुपये किंमतीचे गिफ्ट चे सामान लंपास केले. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपी अजिंक्य हा रुई कलेकशन या गिफ्ट च्या दुकानात पार्टनर असल्याचे समोर आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

डोंबिवली दीनदयाळ रोड वर असलेल्या गिफ्ट च्या दुकानात तब्बल १३ लाख किंमतीचे सामान लंपास करणाऱ्या आरोपीला विष्णुनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण अधिकारी गणेश वडणे यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला डोंबिवली मधील बावानचाळ येथून ताब्यात घेतले.

अधिक तपास केला असता आरोपी अजिंक्य याने गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच त्याच्याकडून चोरी केलेले १३ लाख किंमतीचे गिफ्ट चे सामान व चोरीत वापरला टेम्पो असा एकूण १७ लाख ५५ हजार किंमतीचा मुद्देमाल विष्णुनगर पोलिसांनी हस्तगत केला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

‘जय भीम’ चित्रपटातील दृश्यावरुन वाद

कोल्हापुरात लाखो रुपयांचा दीड हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त

मुक्या जनावरांंवर असंही प्रेम की, त्यांच्या हाकेवर मागे येतात अनेक गाई

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.