Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक : 13 वर्षांच्या मुलीवर चाकूने धाक दाखवत अत्याचार, पोलिसांनी 7 जणांच्या आवळल्या मुसक्या…

  • नाशिकमध्ये एक संतापजनक घटना.
  • चाकूचा धाक दाखवून शेजाऱ्यांनीच केला आत्याचार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नाशिक 10 जानेवारी:– नाशिकमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक आत्याचार करण्यात आला आहे. चाकूचा धाक दाखवून शेजाऱ्यांनीच आत्याचार केल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी एका महिलेसह पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. 

पीडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आईने विश्वासात घेवून मुलीची विचारपूस केली असता ही धक्कादायक बाब उघडकीस आली.आई-वडील घरात नसताना हा प्रकार घडला असल्याचं समोर येत आहे. सायंकाळी ते परतल्यानंतर १३ वर्षाची मुलगी घरात दिसली नाही. त्यामुळे तिची शोधाशोध करण्यात आली. त्यावेळी पीडिता भयभीत अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार पीडितेचे आई-वडील मजुरी करतात. नाशिकरोड पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.