Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! रिक्षाचालक महिलेने प्रियकराच्या मदतीने केली नवऱ्याची हत्या!!

रिक्षाचालक महिला, तिचा प्रियकर आणि साथीदाराला केले गजाआड...

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • पती बेपत्ता असल्याचा केला होता बनाव, कल्याण क्राइम ब्रांचने केली उकल…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

डोंबिवली, दि. १८ जून : एका रिक्षाचालक महिलेने आपल्या पतीची हत्या करून त्याचा मृतदेह नेरळ हद्दीत फेकून दिल्याची घटना उघडीस आली आहे. आपले कृत्य लपवण्यासाठी तिने पती बेपत्ता असल्याची तक्रार डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात नोंदवली. मात्र कल्याण क्राइम ब्रांचने या महिलेचे बिंग फोडले. पोलिसी खाक्या दाखवताच तिने आपणच प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या प्रकरणी लक्ष्मी पाटील, अरविंद उर्फ मारी रविंद्र राम व सनी सागर या तिघा विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्यात दरम्यान मयत प्रवीण पाटील हा खाजगी कंपनीत नोकरीला होता तर लक्ष्मी रिक्षा चालवायची तिथेच तिची अरविंद या रिक्षा चालकासोबत प्रेम सबंध जुळले होते.

डोंबिवली मानपाडा येथे राहणारा प्रवीण पाटील हा ४ जून पासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याची पत्नी लक्ष्मी हिने मानपाडा पोलीस ठाण्यात नोंदवली होती. बरेच दिवस उलटूनही प्रविन चा शोध लागत नव्हता त्यामुळे प्रवीण च्या कुटुंबीयानी संशय व्यक्त करत कल्याण क्राइम ब्रांच कडे धाव घेतली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या प्रकरनाचा तपास करत असताना कल्याण क्राइम ब्रांच च्या पथकाला लक्षमीवर संशय बळावला. पोलिसांनी तिची चौकशी सुरु केली असता चौकशी दरम्यान तिने खोटी माहिती दिल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

त्यानंतर पोलिसांनी लागलीच तिच्या संपर्कात असलेल्या अरविंद उर्फ मारी रविंद्र राम व त्याचा मित्र सनी सागर याला चौकशीसाठी ताब्यात घेत त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली.

अरविंदचे लक्ष्मी सोबत अनैतिक प्रेमसबंध होते. याची कुणकुण लक्ष्मीचा पती प्रविणला लागली या कारणावरून प्रवीण व लक्ष्मीमध्ये वाद होत होते. त्यामुळे या दोघांनी प्रवीण चा काटा काढायचं ठरवले. २ जून रोजी रात्रीच्या सुमारास प्रवीण घरी असताना अरविंद व सनी घरी आला त्यानी प्रवीण ला लोखंडी रॉड ने बेदम मारहाण केली या कृत्यात लक्ष्मी देखील सहभागी होती. त्यांनतर तिघांनी त्याचा गळा दाबून त्याची हत्या केली व त्याचा मृतदेह रिक्षाने नेऊन बदलापूर कर्जत रोडवरील मोरी खाली टाकून दिला होता.

                                   आरोपी अरविंद व त्याचा साथीदार सोनी

 

त्यानंतर संशय येऊ नये म्हणून लक्ष्मीने मानपाडा पोलीस ठाण्यात प्रवीण बेपत्ता असल्याबाबत तक्रार नोंदवली होती. मात्र प्रवीण च्या कुटुंबियांनी संशय व्यक्त करत कल्याण क्राइम ब्रांचकडे धाव घेतली व कल्याण क्राइम ब्रँचच्या पथकाने मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा उलगडा करत याप्रकरणी लक्ष्मी अरविंद व त्यांचा साथीदार सोनी याला देखील अटक केली.

हे देखील वाचा  :

‘त्या’ दोन अभिनेत्रींना चोरीच्या आरोपाखाली अटक

सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरणाचा मसूदा लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करावा – मुख्यमंत्री

राज्य शासन पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.