Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिक्षण हेच सामाजिक विकासाचा पाया आहे : रामदास कोंडागोर्ला

वेलगूर केंद्रांतर्गत शिक्षण परिषदेत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणावर चर्चा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहेरी, दि. २७ जुलै : तालुक्यातील वेलगूर केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मैलाराम येथे संपन्न झालेल्या शैक्षणिक सत्रातील पहिल्या शिक्षण परिषदेत शिक्षण क्षेत्रात होणारे विविध बदल व सामाजिक विकासात शिक्षणाची भूमिका स्पष्ट करताना फुलोरा मूलभूत क्षमता विकास कार्यक्रम, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 , निपुण भारत मिशन, सेतू उपक्रम याविषयी केंद्रातील सर्व उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.

शिक्षण परिषदेचे उद्दिष्टे व महत्त्व पटवून देताना प्रत्येक शिक्षकाची सक्रिय भूमिका याबाबत प्रास्ताविकेतून केंद्रप्रमुख गणपत मेकलवार यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असताना 34 वर्षानंतर 21 व्या शतकातील पहिल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील तरतुदी, निपुण भारत मिशन व फुलोरा उपक्रमातील विविध कृती यांची सांगड घालून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण कशाप्रकारे देता येईल याबाबत तालुका फुलोरा सुलभक रामदास कोंडागोर्ला यांनी विविध उदाहरणे दाखले देऊन सविस्तर मार्गदर्शन केले.

फुलोरा उपक्रमाची पार्श्वभूमी, सुरुवात, त्यातील भाषा व गणित विषयक विविध कृती, प्रत्यक्ष वर्गावर राबवताना येणाऱ्या अडचणी व शिक्षकांचे प्रभावी नियोजन याविषयी तालुका फुलोरा सुलभक दिगंबर दुर्गे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी दिगंबर दुर्गे, वेलगूर शाळेचे मुख्याध्यापक मडावी, गटसाधन केद्रातील विषय साधनव्यक्ती दीपा रामटेके व आदींची उपस्थिती होती.

यावेळी शिक्षण परिषदेत केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित राहून सर्व कृतीत सक्रिय सहभाग घेतले.

फुलोरा भाषा व गणित विषयाचे सादरीकरण शिक्षक गणेश सुर्तेकर व अशोक दहागावकर यांनी केले तसेच परिषदेचे सूत्रसंचलन अशोक दहागावकर यांनी केले.

हे देखील वाचा :

राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय

 

स्थलांतर रोखण्यासाठी JSW फौंडेशन आणि रोटरी क्लबचा आदर्श उपक्रम…

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.