Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सुपरहिट चित्रपट ‘द डर्टी पिक्चर’ मधील अभिनेत्रीचा आर्या बॅनर्जीचा संशयास्पद मृत्यू

Get real time updates directly on you device, subscribe now.

आर्या सुप्रसिद्ध सितारवादक निखिल बॅनर्जी यांची मुलगी होती.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोलकाता डेस्क12 डिसेंबर:- सुपरहिट चित्रपट ‘द डर्टी पिक्चर’ मध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री देवदत्त बॅनर्जी ऊर्फ आर्या हिचा संशयास्पद मृत्यू झाला. अभिनेत्री आर्या बॅनर्जीचा मृतदेह तिच्या दक्षिण कोलकात्यातील जोधपूर पार्क स्थित घरात आढळला आहे. तिच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु असून मृत्यूच्या कारणांचा शोध लावला जात आहे. ‘द डर्टी पिक्चर’ सह आर्या बॅनर्जीने दीबाकर बॅनर्जी यांच्या ‘लव सेक्स और धोखा’ मध्ये देखील काम केले होते. आर्या सुप्रसिद्ध सितारवादक निखिल बॅनर्जी यांची मुलगी होती. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या दिबाकर बॅनर्जी यांच्या ‘लव्ह सेक्स और धोखा’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 2011 मध्ये तिने ‘द डर्टी पिक्चर’मध्येही काम केले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा:-निर्यातीसाठी आंब्याची मँगोनेट प्रणालीने नोंदणी – ३१ मार्चपर्यंत नोंदणीची मुदत

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

असा घडला प्रकार

अनेकदा दार वाजवूनही आतून काही उत्तर न आल्याने घरकाम करणाऱ्या व्यक्तीने शेजाऱ्यांना बोलावलं. बऱ्याच वेळापासून घरात बंद असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी दार उघडताच आर्या तिच्या बेडरुममध्ये जमिनीवर मृतावस्थेत आढळली. ही घटना शुक्रवारी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या नाकावर रक्ताचे काही डाग होते. पण त्याव्यतिरिक्त शरीरावर कुठलीही दुखापत झाली नव्हती. आर्याला एसएसकेएम रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तर आर्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याता आला आहे. शवविच्छेदनाचे अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असेही पोलिसांकडून सांगितले जात आहे.

हे पण वाचा:-नोकरी चा शोधत असणारे तरुणांसाठी एक आनंदाची बातमी, 12 आणि 13 डिसेंबरला online रोजगार मेळावा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.