Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बिपाशा बासू 43व्या वर्षी झालीआई, गोंडस मुलीला जन्म

बिपाशा आणि करण यांचा विवाह 2016मध्ये झाला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 12 नोव्हेंबर :-  बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर नुकतेच आई-बाबा झाले आहेत. बिपाशा बसूने काही वेळापूर्वीच गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिपाशा वयाच्या 43 व्या वर्षी आई झाली आहे. बिपाशा आई झाल्याची बातमी कळताच तिचे चाहते आणि बॉलिवूड कलाकार देखील तिला अनेक शुभेच्छा देत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आलिया-रणबीर आई-बाबा झाले. त्यांच्या नंतर या लिस्टमध्ये आता बिपाशा-करणचं नाव देखील जोडलं गेलं आहे.

लग्नाच्या सहा वर्षानंतर करण आणि बिपाशा आई-वडील झाले आहेत. बिपाशा गेल्या काही दिवसांपासून मॅटर्निटी शूटचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत होती. तसेच बिपाशाने बेबी शॉवरचे फोटोदेखील शेअर केले होते. बाळाच्या गोड बातमीने दोघांचेही चाहते आनंदी झाले आहेत. सोशल मीडियावर बिपाशा आणि करणचे फोटो शेअर करत ते आपला आनंद व्यक्त करत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या बातमीमुळे बिपाशा-करणवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लहानग्या परीच्या येण्याने बिपाशा-करणचं कुटुंब आता पूर्ण झालं आहे.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.