Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अखेर जितेंद्र आव्हाडांसह 12 जणांना कोर्टाने जामीन केला मंजूर

ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी अटक केली होती.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ठाणे, 12 नोव्हेंबर :-  हर हर महादेव सिनेमाचा शो बंद पाडत असताना मनसेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आणि त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. पण, आता आव्हाडांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला.  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड  यांना जामीन मंजूर झाला आहे. 15 हजार रुपयांच्या कॅश बाँडवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. ठाण्यातल्या विवियाना मॉलमध्ये चित्रपट पाहण्यास आलेल्या एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या आधी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आव्हाड यांच्या वतीने त्यांच्या वकिलाने उच्च न्यायालयात धाव घेऊन जामिनासाठी अर्ज दाखल केला. यावेळी आव्हाड यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. आव्हाड यांना लावण्यात आलेली 11 कलमं चुकीची आहेत. त्यातील कलम 7 तर ठाणे जिल्ह्यात लागत नसल्याचं वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने आव्हाड यांच्यासह 12 जणांना जामीन मंजूर केला आहे. आव्हाड यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांना पोलिसांना तपास कामात सहकार्य करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

हे पण वाचा :-

Comments are closed.