Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अखेर जॅकलीनला जामीन मंजूर

200 कोटींचे मनी लाॅन्ड्रिंग प्रकरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 15 नोव्हेंबर :- अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांना 200 कोटींच्या मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणी पटियाला हाउस कोर्टातून मोठा दिलासा मिळाला असून 200 कोटीच्या फसवणूक प्रकरणात अखेर जॅकलीनला जामीन मंजूर झाला आहे.

जॅकलीन फर्नांडिसला मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. 200 कोटीच्या फसवणूक प्रकरणात अभिनेत्री जॅकलीनला जामीन मंजूर करण्यात आला आहे. सर्व नियम आणि अटींचे पालन करावे लागेल. जॅकलीन फर्नांडिसच्या जामीनाची मुदत 10 नोव्हेंबर रोजी संपली. या प्रकरणी न्यायालयाने 11 नोव्हेंबर रोजी निर्णय राखुन ठेवला होता. मात्र, आता जॅकलिनला मोठा दिलासा मिळाला आहे. जॅकलीनची दोन लाखांच्या शाॅरिटी बाॅन्डवर जामीन मंजूर झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जॅकलीन फर्नांडिसवर अनेक गंभीर आरोप आहेत. त्यापैकी एक म्हणजे तिला सुकेश चंद्रशेखर या ठगाच्या काळ्या कृत्यांची माहिती होती आणि तरीही ती त्या ठगाकडून महागड्या भेटवस्तु घेत असे. जॅकलीन फर्नांडिसच्या वकिलाने कोर्टात बचाव करतांना ईडीचे आरोप साफ फेटाळून लावले होते. ते म्हणाले होते की, अभिनेत्रीने नेहमी तपासात सहकार्य केले आहे. उलट ईडीने नेहमीच अभिनेत्रीला त्रास दिला आणि खोटे आरोप केले.

दरम्यान, गेल्या बर्याच दिवसांपासून महाठग सुकेश चंद्रशेखर प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखर ने 200 कोटींचा केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून या प्रकरणी अनेक बाॅलिवूडची नावे समोर आली आहेत. याच प्रकरणात प्रामुख्याने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचे नाव समोर आले होते. त्यामुळे दिवसेंदिवस तिच्या अडचणी वाढत होत्या. मात्र, आता पटियाला हाउस कोर्टाकडून जॅकलीनला दिलासा मिळाला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

Comments are closed.