Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागपुरात जिल्ह्यात ब्लॅक फंगसने एकाचा मृत्यू तर चार जण बाधित

ब्लॅक फंगस विळख्याचे तांडव थांबेना

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाची तिसरी लाट दारात उभी असल्याचे भाकित वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मांडत आहेत. मात्र तुर्तास दुसऱ्या लाटेतून मुक्ती अनुभवणाऱ्या नागपूर जिल्ह्यात कोव्हिडपश्चात उद्भवलेल्या ब्लॅक फंगसचे तांडव काही कमी व्हायला तयार नाही.

कोरोनावर मात करीत असताना झालेल्या उपचारात स्टिरॉईडची मात्रा सहन न झाल्याने मधुमेहाचा पूर्व इतिहास असलेल्यांना या बुरशीचा विळखा वाढत आहे. सोमवारी यात जिल्ह्यातून आणखी 4 नव्या रुग्णांना या बुरशीने गाठल्याचे निदान करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे एकट्या नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनापश्चात या बुरशीजन्य आजाराचा विळखा पडलेल्यांची संख्या 1692 पर्यंत पुढे सरकली आहे. धक्कादायक बाब म्हणजे उपचारादरम्यान सोमवारी आणखी एका ब्लॅकफंगसग्रस्ताचा मृत्यू ओढवला. त्यामुळे ब्लॅक फंगस बळी संख्याही वाढून 169 पर्यंत धडकली.

नागपूरसोबतच आतापर्यंत विभागातील वर्धा जिल्ह्यात 135, चंद्रपुरात 112, गोंदियात 48 तर भंडारा जिल्ह्यात 19 जणांना या बुरशीने गाठले. त्यातील गोंदिया जिल्ह्यात 9 तर चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी 5 मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

ईद साठी आणलेल्या १५ बकऱ्यांचा बुडून मृत्यू; मुंब्र्यात मुसळधार पावसाचा फटका

मुंबईत दरड कोसळण्याच्या घटना दुर्दैवी; धोकादायक घरांतील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करण्याचे निर्देश -पालकमंत्री आदित्य ठाकरे

बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा पुढाकार – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.