Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ठाणे मुंब्रा – शिळ ते पनवेल वाहतूकीसाठी अनिश्चित काळाकरता बंद!

शिळरोड गेली तीन दिवस पाण्याखाली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क :मुंब्रा पनवेल-हायवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुंब्रा, शिळफाटा परिसरात पावसाचा जोर वाढतच चालल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने शिळफाटा ते नेक्सट वर्ल्ड बिल्डिंग ते खान कम्पाउंड हा भाग पुर्णत: पाण्याखाली गेले आहे. अनावश्यक घराबाहेर पडू नये असं आवाहन ठाणे पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

मुंब्रा, शिळफाटा व पारसिक डोंगररांग इथं चालू मुसळधार पावसामुळे मुंब्रा पनवेल हायवे वर पाण्याचा प्रवाह आला आहे 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पावसाच्या पाण्यामुळे गेली ३ दिवस पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक कोंडीमुळे चांगलाच चर्चेत आलेला आहे.  यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे. सतत पडत असेलल्या पावसामुळे काही ठिकाणी छाती एवढे पाणी साचले आहे.

रविवारी सायंकाळी ४ नंतर तर शिळरोडवर प्रलयकारी परिस्थिती पहायला मिळाली. अनेक गाड्या पाण्यांखाली अडकून पडल्या होत्या आजही तीच परिस्थिती असून नाईस वर्ल्ड बिल्डिंग ते खान कम्पाउंड या भागात अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शीळडाय घर हा परीसर डोंगरींनी वेढलेला असून शिळरोडचे सिमेंटीकरण झाले आहे आणि हेच मुख्यकारण आहे येथे पाणी साचण्याचे असं इथल्या स्थानिकांचे म्हणणे आहे. कारण सिमेंटीकरण करताना डोंगरावरुन येणारे पावसाचे पाणी निचरा होण्याकरता असलेल्या ड्रेनेज लाईन गटारे या सिमेंटीकरणात पुर्णत: बुझून गेलेत. तसेच या भागात अनधिकृत बांधकामे देखील मोठ्या प्रमाणात वाढली असून या सर्वचा फटका सामान्य जनतेला बसतोय कारण डोंगरावरुन येणारे पाणी निचरा व्हायला जागाच उरली नाही.

हे देखील वाचा :

ईद साठी आणलेल्या १५ बकऱ्यांचा बुडून मृत्यू; मुंब्र्यात मुसळधार पावसाचा फटका

नागपुरात जिल्ह्यात ब्लॅक फंगसने एकाचा मृत्यू तर चार जण बाधित

बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा पुढाकार – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक

 

Comments are closed.