Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्हयात 990 कोरोना तपासण्यांपैकी 30 कोरोनाबाधित तर 2 कोरोनामुक्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि.9 जानेवारी: आज गडचिरोली जिल्हयात 990 कोरोना तपासण्यांपैकी 30 नविन कोरोना बाधित झाले असून 2 जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30998 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30104 आहे.तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 147 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 747 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.12 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.47 टक्के तर मृत्यू दर 2.41 टक्के झाला आहे. आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 21, भामरागड तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 07, आणि मुलचेरा तालुक्यातील 1 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 02 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 01, आणि एटापल्ली तालुक्यातील 1 जणाचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

दिवसा जमावबंदीसह उद्या पासून गडचिरोली जिल्हयात कोरोनाबाबत नवीन निर्बंध लागू

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात १० व ११ जानेवारी रोजी पावसाची शक्यता 

महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्पचे अस्तित्व धोक्यात…

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.