Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्पचे अस्तित्व धोक्यात…

गडचिरोलीचे हत्ती जाणार आता गुजरातच्या ‘अंबानी झू’ मध्ये....

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि. ९ जानेवारी : गडचिरोली जिल्ह्याच्या कमलापूर येथे वनविभागाचे शासकीय हत्ती कॅम्प आहे. हे महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्प असून गडचिरोली जिल्ह्यातील मोठे पर्यटन स्थळ आहेत. या पर्यटन स्थळास हत्ती पाहण्यासाठी दररोज शेकडो पर्यटकांची गर्दी होत असते. या एकमेव हत्ती कॅम्पने राज्यात महत्वाचे स्थान देखील निर्माण केले आहेत. परंतु आता हत्ती कॅम्पचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कारण कमलापूर येथील ७ पैकी ४ हत्ती आता रिलायन्स ग्रुपच्या वतीने गुजरातमध्ये उभारल्या जात असलेल्या ‘ग्रीन्स झुलाजिकल रेस्क्यू अँँड रिहाबिलीटेशन किंग्डम’ (प्राणिसंग्रहालयाला) येथे दिले जाणार असल्याने येथील ग्रामस्थाकडून तीव्र विरोध व संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या जामनगर भागात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून देशातील सर्वांत मोठे प्राणिसंग्रहालय उभारले जात आहे. या खासगी प्राणिसंग्रहालयासाठी देशभरातून विविध वन्यप्राणी मागविले जात आहेत. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाकडून अनेक ठिकाणचे दुर्मीळ प्राणी या प्राणिसंग्रहालयासाठी देण्याची अनुमतीही दिली जात आहे.  हे संग्रहालय रिलायन्सचे कनिष्ठ पुत्र अनंत अंबानी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. या संग्रहालयाचे नाव ‘ग्रीन्स झुलाजिकल रेस्क्यू अँँड रिहाबिलीटेशन किंग्डम’ (Greens Zoological Rescue and Rehabilitation Kingdom) असे आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाच्या ताब्यातील कमलापूर हत्ती कॅम्पमधून ७ पैकी ४ हत्ती, तर आलापल्लीतील ३ पैकी ३ हत्ती गुजरातला पाठविले जाणार आहेत. कमलापूरमधील कोणते ४ हत्ती घेऊन जायचे हे रिलायन्सने पाठविलेले डॉक्टरच ठरवतील. त्यामुळे चांगले हत्ती गेल्यानंतर कमलापुरात शिल्लक राहणाऱ्या ३ हत्तींची वंशावळ वाढू शकली नाही तर येथील हत्ती कॅम्पचे अस्तित्वच संपुष्टात येणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कमलापूर आणि आलापल्ली येथील नैसर्गिक जंगलात ४० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून वन विभागाकडून हत्तींचे पालनपोषण केले जाते. या हत्तींची वंशावळ वाढून कमलापुरात १० पेक्षा जास्त हत्ती झाले होते. त्यामुळे नक्षलग्रस्त भाग असूनही राज्यभरातील पर्यटक येथे हत्तींना पाहण्यासाठी येतात आणि येथील नैसर्गिक वातावरणात रमतात; पण आता हत्ती गेल्यानंतर हा कॅम्प ओसाड पडणार आहे.

कमलापूरमधील हत्तींच्या पालनपोषणासाठी राज्य सरकारकडून वेळेवर निधी मिळत नाही. हत्तींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ, पशुवैद्यकीय अधिकारीही नाही. गेल्या दोन वर्षांत या कॅम्पमधील तीन हत्तींची पिले आजारांनी मरण पावली. राज्यात एकमेव असलेल्या या हत्ती कॅम्पकडे सरकारने लक्ष दिल्यास गडचिरोलीतील पर्यटन वाढून रोजगारनिर्मिती होऊ शकते.

हे देखील वाचा : 

आरोग्य कर्मचारी संपावर!…

माध्यमांचे एकांगीकडे वाटचाल!

राहूल गांधी आणि हिंदुत्वाच्या मांडणीतील गोंधळ – ज्ञानेश वाकुडकर

 

Comments are closed.