Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माध्यमांचे एकांगीकडे वाटचाल!

पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमात साहित्यिक डॉ. प्रशांत राऊत यांचे प्रतिपादन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

बल्लारपूर, दि. ९ जानेवारी :पत्रकारितेला आलेलं व्यावसायिक रूप हे खऱ्या अर्थानं लोकशाहीसाठी घातक ठरलं आहे. पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा तरच खरंच पत्रकारितेला न्याय मिळेल. तो छंद म्हणून जोपासावा. मात्र, अलीकडे त्याला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहेत. त्यामुळे ती एकांगी होत चालली आहेत. हे लोकशाहीसाठी घातक आहे.” असे साहित्यिक प्रा. डॉ. प्रशांत राऊत यावेळी प्रतिपादन केले. ते महाराष्ट्र पत्रकार संघ बल्लारपूर तालुका शाखेच्या वतीने पत्रकार दिवस तथा पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त बल्लारपूर येथे आयोजीत सोहळ्यात बोलत होते.

या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात जेष्ठ पत्रकार आशिष अम्बाडे यांनी “पत्रकारिता करतांना पत्रकारितेची मूल्ये जोपासावी.” असे आवाहन यावेळी केले.  तर  प्रा. डॉ. विजय सोरते यांनी आपल्या भाषणादरम्यान “ग्रामीण पत्रकारांना संरक्षण नाही. त्यामुळे त्यांना लिखाणात बरीच पथ्य पाळावे लागते. त्याला सामाजिक भान असूनही तो वास्तविकता मांडण्याची हिम्मत करू शकत नाही. शिवाय त्याच्यावर भांडवलदारांचे प्रभुत्व आहे.” असे परखड मत व्यक्त केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मुख्याधिकारी विजय सरनाईक, प्रमुख अतिथी प्रा.डॉ.विजय सोरते, प्रा. डॉ. प्रशांत राऊत प्रमुख उपस्थिती पद्माकर पांढरे, सुरेश रामगुंडे यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलन करुन करण्यात आली. यावेळी सामाजिक, क्रीडा, कला, शिक्षण, उद्योग, राजकीय, शासकीय आणि ईतर क्षेत्रातील मनावरांचा कार्य गौरव सत्कार सोहळा पार पडला. कोरोनाच्या पार्श्भूमीवर सामाजिक अंतर आणि मास्क लावून कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याची विनंती आयोजकांच्या वतीने आधीच करण्यात आली होती.

प्रास्ताविक भाषण संघाचे राज्य कार्यकारीणी सदस्य पद्माकर पांढरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत विघ्नेश्वर यांनी तर आभाप्रदर्शन घनश्याम बुरडकर यांनी केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष रमेश निषाद, अजय रासेकर, विकास राजूरकर, पारिश मेश्राम, विवेक गडकर, प्रशांत भोरे, ज्ञानेंद्र आर्य, प्रशांत विघ्नेश्वर, अनकेश्र्वर मेश्राम, सुभाष भटवलकर, वैभव मेश्राम, घनश्याम बुरडकर, देवेंद्र झाडे, ऍड. संजय बोराडे यांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा : 

आरोग्य कर्मचारी संपावर!…

सोमवारी गडचिरोली जिल्हयात शालेय लसीकरण दिवस

लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या नावाचा महापुरुषांच्या यादीत समावेश केल्यामुळे मातंग समाजाच्या विविध संघटनांनी मानले केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आभार

Comments are closed.