Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरोग्य कर्मचारी संपावर!…

सहा महिन्यापासून मानधन रखडल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतला निर्णय.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि. ९ जानेवारी : आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील सहा महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने त्रस्त कर्मचाऱ्यांनी ७ जानेवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात कोरोना तपासणीचे काम ठप्प पडले असून रुग्णांची ओळख न झाल्याने रुग्णांचा एकाच वेळी रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे जाणकारांनी व्यक्त केले आहे .

जिल्हा परिषद प्रशासनाने कोरोना तपासण्या करण्यासाठी व लॅबमध्ये काम करण्यासाठी २८ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. मात्र, या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून मानधनच मिळाले नाही. मानधन देण्यात यावे, यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही शासनाने जिल्हा परिषदेला त्यांच्या मानधनाचे अनुदान उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवार दि. ७ जानेवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. परिणामी, कोरोना तपासण्या करण्याचे काम ठप्प पडले असल्याचे दिसून येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अँटिजनवर सुरु आहे चालढकल

आरटीपीसीआर चाचण्या करण्यासाठी या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्याशिवाय दुसरा कोणताच कर्मचारी हि चाचणी करू शकत नाही. कोरोना विषाणूची खरी ओळख याच चाचणीमुळे होते.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी शासनाकडून अनुदान उपलब्ध होते. मात्र, हे अनुदानच उपलब्ध झाले नाही. अनुदानासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. अनुदान उपलब्ध होताच मानधन दिले जाईल.

डॉ. संजयकुमार जठार – जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली

हे देखील वाचा : 

सोमवारी गडचिरोली जिल्हयात शालेय लसीकरण दिवस

वनविभागाच्या दडपशाहीला न जुमानता आमचा हा लढा सुरू राहणार – राजु झोडे

लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या नावाचा महापुरुषांच्या यादीत समावेश केल्यामुळे मातंग समाजाच्या विविध संघटनांनी मानले केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आभार

 

Comments are closed.