Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या नावाचा महापुरुषांच्या यादीत समावेश केल्यामुळे मातंग समाजाच्या विविध संघटनांनी मानले केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आभार

महापुरुषांच्या यादीत क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांचे नाव समविष्ट करणार - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे मातंग समाजाला आश्वासन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, दि. ८ जानेवारी : केंद्र सरकार च्या डॉ बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन च्या महापुरुषांच्या यादीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव समाविष्ट केल्यामुळे मातंग समाजाच्या विविध संघटना आणि प्रतिनिधी नेत्यांनी आज बांद्रा येथे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची भेट घेऊन जाहीर आभार मानले. दलीतरत्न म्हणून मातंग समाजाच्या वतीने ना रामदास आठवले यांचा भव्य पुष्पहाराने सन्मान करण्यात आला.

जसे लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचे नाव महापुरुषांच्या यादीत घेतले तसेच आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे ही नाव महापुरुषांच्या यादीत घ्यावे या मागणीचे निवेदन यावेळी मातंग समाजाच्या वतीने माजी आमदार सुधाकर भालेराव आणि हनुमंत साठे यांच्या नेतृत्वात विविध मातंग समाजाच्या प्रतिनिधींनी ना. रामदास आठवले यांना दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी झालेल्या चर्चेत क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव डॉ आंबेडकर फाउंडेशनच्या महापुरुषांच्या यादीत घेणार असल्याचे आश्वासन दिले मात्र त्याच बरोबर देशभरातील महापुरुषांच्या नावाची दखल घेतली गेली नाही अशा सर्व नावांसाठी विशेष बैठक घेऊन सर्व नावांची नोंद डॉ बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन च्या महापुरुषांच्या यादीत घेऊ. असे आश्वासन ना रामदास आठवले यांनी यावेळी दिले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव महापुरुषांच्या यादीत घेण्यासाठी ना. रामदास आठवले यांनी तातडीने पाऊले उचलली ते पाहता देशात दलितांचा नेता रामदास आठवले हेच आहेत. असे मातंग समाज मानत असल्याचे उपस्थित मातंग समाज प्रतिनिधी यांनी भावना व्यक्त केली. लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न किताब मिळण्यासाठी ना. रामदास आठवले प्रयत्न करीत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

लोकशाहिर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाद्वारे मातंग समाजाला कर्ज देणे सुरू करावे. अशी मागणी यावेळी मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली. यावेळी माजी आमदार सुधाकर भालेराव; रिपाइं चे मातंग आघाडी चे प्रदेश अध्यक्ष हनुमंत साठे; लहुजी वास्तव साळवे समाधी स्मारक समिती अध्यक्ष बापूसाहेब डाकले; दलितमित्र अंकल सोनवणे; अनिल हातागळे; प्रमोद ठोंबरे; नंदू साठे; रमेश शेलार; विरेन साठे; शंकर शेलार; विनोद शिंदे; बिडी चव्हाण; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

वनविभागाच्या दडपशाहीला न जुमानता आमचा हा लढा सुरू राहणार – राजु झोडे

संसदीय स्थायी ऊर्जा समितीचा अध्ययन दौऱ्यात खा. अशोक नेते यांचा सहभाग

सोमवारी गडचिरोली जिल्हयात शालेय लसीकरण दिवस

 

Comments are closed.