Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्ह्यात रविवारी नवीन 165 कोरोनाबाधितांची नोंद तर 136 कोरोनामुक्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. 30 जानेवारी :  आज गडचिरोली जिल्हयात 708 कोरोना तपासण्यांपैकी 165 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 136 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 34650 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 32633 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1262 झाली आहे.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 755 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.18 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.64 टक्के तर मृत्यू दर 2.18 टक्के झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज नवीन 165 बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 61, अहेरी तालुक्यातील 06, आरमोरी तालुक्यातील 06, भामरागड तालुक्यातील 03, चामोर्शी तालुक्यातील 15, धानोरा तालुक्यातील 10, एटापल्ली तालुक्यातील 05, मुलचेरा तालुक्यातील 08, सिरोंचा तालुक्यातील 04, कोरची तालुक्यातील 04, कुरखेडा तालुक्यातील 06 आणि वडसा तालुक्यातील 37 जणाचा समावेश आहे.

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 136 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 112, अहेरी तालुक्यातील03, आरमोरी तालुक्यातील 03, भामरागड तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 04, धानोरा तालुक्यातील 04, एटापल्ली तालुक्यातील 01, मुलचेरा तालुक्यातील 04, सिरोंचा तालुक्यातील 00, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील 05,आणि वडसा तालुक्यातील 00 जणाचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा  : 

धक्कादायक! महिला पोलीस शिपाईने केली आत्महत्या!

भीषण अपघात: कार-कंटेनरची समोरासमोर धडक, धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.