Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्ह्यातील 133 प्राथमिक शाळा होणार बंद…

पट संख्ये अभावी शाळांवर गंडांतर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वाशीम 29 सप्टेंबर :-  राज्य सरकारने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा किंवा त्यालगतच्या शाळेत समायोजित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.यामुळे वाशीम जिल्ह्यातील १३३ मराठी शाळांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७७९ शाळा असून, त्यापैकी १३३ शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या आहे.शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहोचविण्यासाठी शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांची सुविधा उपलब्ध केली. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थी टिकून राहावा, यासाठी विद्यार्थ्यांना गणवेशापासून ते पाठ्यपुस्तक व मध्यान्ह भोजन आदी पुरवण्यात येते. मात्र, यानंतरही पटसंख्या वाढली नाही.

वाशीम जिल्ह्यातील १३३ शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या आहे. याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आला. या शाळा बंद किंवा नजीकच्या शाळेत समायोजित करण्याबाबत शासनाचे आदेश अद्याप प्राप्त झाले नाहीत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.