Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हत्या आणि आत्महत्या प्रकरणातून बोईसर हादरले…

प्रेम प्रकरणातून तरुणीला गोळी घालून माथेफिरु तरुणाची आत्महत्या..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मनोज सातवी, बोईसर.पालघर 29 सप्टेंबर :-  बोईसर परिसर एका माथेफिरू तरुणाने भरदिवसा तरुणीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात स्नेहा दिनेशकुमार मेहतो या तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गोळीबार करून आरोपी तरुणाने CISF च्या वाहनाखाली स्वतःला झोकून देऊन आत्महत्या केली. प्रेम प्रकरणातून हा गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज बोईसर पोलिसांकडून व्यक्त केला जातोय.

पालघर जिल्ह्यातील बोईसर औद्योगिक वसाहत परिसरातील वर्दळीच्या ठिकाणी भर दिवसा गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. कृष्णा यादव या माथे फिरू तरुणाने प्रेम प्रकरणातून स्नेहा मेहतो या तरुणीवर त्याच्याकडील गावठी कट्ट्याने गोळीबार केला. थेट डोक्यालाच गोळी लागल्याने स्नेहाचा जागीच मृत्यू झाला. यात आणखी धक्कादायक बाब म्हणजे गोळीबार करून आरोपी दिनेश आपल्या स्कूटरवरून घटनास्थळावरून पळून गेला आणि समोरून येणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या म्हणजेच CISF च्या गाडी खाली स्वतःला झोकुन दिले. या दुर्घटनेत दिनेश वाहनाखाली चिरडला गेला. दिनेश चे दोन्ही पाय तुटले तसेच त्याच्या डोक्यालाही गंभीर इजा होऊन जखमी झाला. त्याला जवळच्या टीमा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं,परंतु रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस घटनास्थळी पोहोचून दिनेश कडून गावठी कट्टा हस्तगत केला आहे. याप्रकरणी बोईसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विशेष म्हणजे आरोपीने गोळीबारात अवैध गावठी कट्ट्याचा वापर केल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी मोठ्या औद्योगीकरणामुळे परप्रांतीय विशेषता उत्तर भारतीय कामगारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या परिसरात अवैद्य हत्यारे मोठ्या प्रमाणात बाळगली जातात हे वेळोवेळी घडणाऱ्या गुन्ह्यातून उघड झाले आहे. तसेच अवैद्य धंद्यांचे ही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांकडून अवैध धंद्यांची पाठराखण केली जाते का ? असा सवाल उपस्थित होतो.

बोईसर परिसरात औद्योगिकीकरणामुळे आणि वाढत्या नागरिकीकरणामुळे या परिसरात दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना देखील वाढत्या गुन्हेगारीची झळ बसत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

 

Comments are closed.