Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागपुरच्या 75 विद्यार्थिनींनी धावत्या मेट्रोत 75 मिनिटात 75 चित्र रेखाटून त्यात स्वातंत्र्य उत्सवाचे रंग भरले ..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नागपूर, 05, ऑगस्ट 22 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करीत आहे काही संस्थांच्या माध्यमातून सायकल रैली, स्कूटर रैली, जनजागृती करून करीत आहे पण आज नागपूरात सेन्ट उर्सला शाळेच्या विद्यार्थिनींनी धावत्या मेट्रोत चित्र काढून स्वातंत्राचा अमृत महोत्सव साजरा केला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी नागपुरच्या 75 विद्यार्थिनींनी धावत्या मेट्रोत 75 मिनिटे 75 चित्र रेखाटून त्यात स्वातंत्र्य उत्सवाचे रंग भरले. विद्यार्थिनींनी हातात ब्रश आणि कलर बॉक्स घेऊन त्यांनी आपल्या मनानी स्वातंत्राचा अमृत महोत्सव निमित्य विविध प्रकारचे चित्र रेखाटले. विद्यार्थिनींनी रेखाटलेल्या चित्रांमध्ये भरलेले रंग म्हणजे स्वातंत्र्यवीरांनी केलेला त्याग, बलिदान आणि समर्पण दर्शवतो. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या वीर योध्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, ज्यांनी त्याग केला, ज्यांनी स्वतःचे जीवन समर्पित केले अशा सर्व शूर वीरांना या विद्यार्थिनींनी चित्र आणि रंगाच्या माध्यमातून अभिवादन केले आहे.
धावत्या मेट्रोमध्ये चित्र रेखाटून त्यात स्वातंत्र्याचे रंग भरून या वेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करूया ही संकल्पना शाळेच्या शिक्षकांनी आर्टच्या विद्यार्थिनी समोर मांडली. त्यावेळी विद्यार्थिनींना उत्साह बघण्यासारखा होता. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवा निमित्त साजरा होत असलेल्या उत्सवात भाग घेण्याची मोठी संधी मिळाल्यामुळे मन गौरवीत झाल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली आहे.
75 विद्यार्थिनींनी फ्लूट आर्ट ऍक्टिव्हिटी आणि फेब्रिक पेंटींगच्या माध्यमातून कॅनवसवर स्वातंत्र्य लढच्या गौरवशाली इतिहास रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. धावत्या मेट्रो ट्रेनमध्ये एकाच वेळी 75 विद्यार्थिनींनी 75 मिनिटे 75 चित्र रेखाटण्याचा उपक्रम यापूर्वी भारतात कुठेही झालेला नाही. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्त या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये केली जावी, अशी इच्छा सेंट उर्सुला गर्ल्स शाळेच्या शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

हे देखील वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

धक्कादायक! अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.