Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

​​३४९ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने पुण्यात साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची १०० फुटी कागदी प्रतिमा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

पुणे, 6 जून- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४९ व्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधत पुण्यातील हडपसर येथील अमनोरा मॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तब्बल १०० फूट कागदी प्रतिमा साकारण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे आणि सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांच्या संकल्पनेतून उद्देश पघळ आणि ऋतुजा घुले या दोन कलाकारांनी ही प्रतिमा साकारली आहे. ही प्रतिमा साकारण्यास केवळ १२ तास इतका वेळ लागला. साडेसतरानळी गावचे उपसरपंच आणि शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष रुपेश तुपे यांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या या १०० फूट प्रतिमेसाठी ४ इंच बाय ४ इंच आकाराच्या तब्बल ५० हजार घोटीव कागदी तुकड्यांचा वापर करण्यात आला. पुणे शहरात अशाप्रकारची शिवरायांची प्रतिमा पहिल्यांदाच साकारण्यात आली आहे हे विशेष. गुरुवार ८ जूनपर्यत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत संपूर्ण दिवस अमनोरा मॉल, हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची ही १०० फूटी कागदी प्रतिमा नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध असेल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.