Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

१५ वर्षीय मुलीचा वीज पडून मृत्यू

वाशीम शहरातील रेल्वे स्टेशन येथील घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वाशीम 6 ऑक्टोबर :-  वाशीम जिल्ह्यात ५ ऑक्टोबरच्या सायंकाळी विजांच्या कडकडाटासह सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळला असून वाशीम येथील ज्योती बनसोडे या विद्यार्थीनीचा विज अंगावर कोसळून म्रूत्यु झाला आहे. शिकवणी वर्गावरून आपल्या भावासोबत घरी जात असतांना रेल्वे उड्डाण पुलावर अचानक अंगावर वीज कोसळल्यानं ही दुर्घटना घडली.

दरम्यान,काल ५ ऑक्टोबर रोजी रात्री रिसोड शहरातील नगर परिषद मराठी शाळेजवळ सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्यावर झाड पडले असून या घटनेत कुणालाही दुखापत झाल्याची माहिती नाही. मात्र झाड पडल्याने तेथे ठेवलेल्या छोट्या व्यापाऱ्यांच्या हातगाड्यांचे नुकसान झाले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.