Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

१६१ वी धाविर महाराज ब्रिटिशकालीन पोलीस मानवंदना परंपरा कायम.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

रायगड, 06,ऑक्टोबर :- रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज यांना ब्रिटिश काळापासून देण्यात येणारी १६१ वी धाविर महाराज ब्रिटिशकालीन पोलीस मानवंदना परंपरा कायम ठेवत धाविर महाराज यांना पोलिसांकडून आज गुरुवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० वाजता मानवंदना देण्यात आली.

त्यानंतर पालखी सोहळा सुरू झाला. पोलिसांकडून मानवंदना देण्यात येणारे पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरानंतर राज्यातील हे दुसरे मंदिर आहे. सालाबाद प्रमाणे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी धाविर महाराजांना मानवंदना देऊन ढोल ताशांच्या गजरात खालुबाजूच्या पारंपरिक वाद्यात व फटाक्यांची आतिषबाजी करत पालखी ला सुरुवात केली. पालखी सोहळ्यानिमित्त मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मानवंदना दिल्यानंतर श्री धावीर महाराज यांची पालखी मंदिरातून आपल्या भावाच्या भेटीला रवाना झाली.

श्री धावीर महाराज हे रोहा शहरासह तालुक्याचे ग्रामदैवत आहे. नवरात्रोत्सवात नऊ दिवस मोठ्या उत्साहात धावीर महाराजांचा उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी धावीर महाराज पालखी सोहळा उत्सवात साजरा केला जातो. पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी खासदार सुनील तटकरे ,आमदार अनिकेत तटकरे, आमदार आदिती तटकरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख समिर शेडगे अशा असंख्य भाविकांच्या उपस्थितीत आज धावीर महाराज पालखी सोहळ्यात सुरुवात झाली असून खा सुनील तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते धावीर महाराजांना हार घालण्याचा मान मिळाला.

हे देखील वाचा :-

धक्कादायक महिला डॉक्टरची गळफास घेवून आत्महत्या

Comments are closed.