Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्याच्या भाजप वर्तुळात मोठी घडामोड !

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर, 26 नोव्हेंबर :- राज्याच्या भाजप वर्तुळात मोठी घडामोड, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची राष्ट्रीय ओबीसी कमिशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती, तशा आशयाचे पत्र झाले जारी, अहीर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून 4 वेळा होते खासदार, 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराकडून पराभव झाला होता , भाजपच्या ओबीसी आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अहीर आहेत , राज्यात ओबीसी आरक्षणाबाबत रणकंदन चालले असताना भाजपने घेतलाय मोठा निर्णय.

राज्याच्या भाजप वर्तुळात मोठी घडामोड बघायला मिळाली आहे. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या वतीने तशा आशयाचे पत्र जारी झाले आहे. अहीर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून 4 वेळा खासदार होते.  2019 च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला होता. सध्या हंसराज अहीर भाजपच्या ओबीसी आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. राज्यात ओबीसी आरक्षणाबाबत रणकंदन चालले असताना भाजपने हा मोठा निर्णय घेतला आहे. नव्या नियुक्तीसाठी अहिर यांनी राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मु आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. हे एक घटनात्मक पद असून ओबीसी प्रवर्गाच्या सर्व जातींना नोकरी -शिक्षण व बढतीविषयक आरक्षणामध्ये अन्याय होऊ नये याबाबत आपण कार्यरत राहणार असल्याचे अहिर म्हणाले. सर्व समाजाच्या प्रगती सोबतच मागासवर्गीयांची देखील प्रगती व्हावी व त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण तत्पर राहू असेही अहीर म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

खोकड ह्या प्राण्याचा रस्ते अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांच्या हस्ते गुरवळा नेचर सफारी चा शुभारंभ !

खाजगी बस पलटल्याने अपघात ; तीन गंभीर तर पंधरा किरकोळ जखमी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.