Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुलचेरा तालुक्यात बालविवाह रोखला

जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, गडचिरोली यांची कार्यवाही

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 26 नोव्हेंबर :- गडचिरोली जिल्हयातील मूलचेरा तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह जोडण्याकरिताची बोलणी सुरू असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार लगेच जिल्हा बाल संरक्षण टीमनी सदर बालविवाह थांबविला. बालिकेचा विवाह होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली लगेच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचाऱ्यांनी मूलचेरा तालुक्यातील अंगणवाडी येथे भेट घेऊन बालिकेच्या वयाची खात्री केली असता सदर बालिकीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्याबाबत खात्री पटल्यानंतर गावातील पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका यांना घेऊन बालिकेचे घर गाठले तिथे उपस्थित मुलाकडील पाहुणे मंडळी व मुलीकडील मंडळी व गावातील पंच यांचे बैठक सुरू होती यात पंच यांचे सदर लग्न करणयास मनाई दिसून आली यात गावातील माजी पोलीस पाटील सुभास दास (पटेल) यांचे दोन्ही पक्षाला समज देण्याकरिता मोलाचे सहकार्य लाभले.

त्यानुसार बालिकेचे वडीलांना बालिकेचा जन्मपुरावा दाखवण्यासंदर्भात विचारले असता बालिकेचे वय 16 वर्ष 10 महिने असल्याचे कागदपत्र नुसार लक्षात आले. त्यामुळे लग्नाची बोलणी करून लग्न लावण्याबाबत मनाई करण्यात आली तसेच लग्न केल्यास बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली. त्यानुसार बालिकेचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करू नका अशी हमीपत्र पालकांकडून लिहून घेतले व बालिकेचे समुपदेशन करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली जिल्हयातील मूलचेरा तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह जोडण्याकरिताची बोलणी सुरू असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार लगेच जिल्हा बाल संरक्षण टीमनी सदर बालविवाह थांबविला. बालिकेचा विवाह होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली लगेच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचाऱ्यांनी मूलचेरा तालुक्यातील अंगणवाडी येथे भेट घेऊन बालिकेच्या वयाची खात्री केली असता सदर बालिकीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्याबाबत खात्री पटल्यानंतर गावातील पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका यांना घेऊन बालिकेचे घर गाठले तिथे उपस्थित मुलाकडील पाहुणे मंडळी व मुलीकडील मंडळी व गावातील पंच यांचे बैठक सुरू होती यात पंच यांचे सदर लग्न करणयास मनाई दिसून आली यात गावातील माजी पोलीस पाटील सुभास दास (पटेल) यांचे दोन्ही पक्षाला समज देण्याकरिता मोलाचे सहकार्य लाभले.

त्यानुसार बालिकेचे वडीलांना बालिकेचा जन्मपुरावा दाखवण्यासंदर्भात विचारले असता बालिकेचे वय 16 वर्ष 10 महिने असल्याचे कागदपत्र नुसार लक्षात आले. त्यामुळे लग्नाची बोलणी करून लग्न लावण्याबाबत मनाई करण्यात आली तसेच लग्न केल्यास बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली. त्यानुसार बालिकेचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करू नका अशी हमीपत्र पालकांकडून लिहून घेतले व बालिकेचे समुपदेशन करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

खोकड ह्या प्राण्याचा रस्ते अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

राज्याच्या भाजप वर्तुळात मोठी घडामोड !

Comments are closed.