Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कालबध्द वेळेत प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रकल्प प्रमुखाची नेमणूक करण्यात यावी- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. 16 मार्च: हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेमध्ये सध्या विविध प्रकल्पावर संशोधन आणि चाचणीचे काम सुरु आहे. हे सर्व कामे कालबध्द वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रकल्प प्रमुखाची नेमणूक करण्यात यावी असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

हाफकिन प्रशिक्षण संशोधन व चाचणी संस्थेची 59 वी नियामक परिषदेची बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासह हाफकिन संस्थेच्या संचालिका सीमा व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह हाफकिन संस्थेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उच्च स्तरीय तज्ञ समितीच्या प्रगती अहवालाबाबत कार्यवाही होणे अत्यंत आवश्यक आहे. ही कार्यवाही कालब्ध वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रकल्प प्रमुख नेमण्यात यावा. याशिवाय हाफकिन प्रशिक्षण संशोधन व चाचणी संस्था, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांनी एकत्रपणे येऊन काम करणे आवश्यक आहे. हाफकिन येथे सुरु असलेल्या प्रकल्पांना गती देण्याबरोबरच प्रस्तावित औषधांची चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याला गती देण्यात यावी. हाफकिन संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना फेलोशिप आणि पीएच.डी करण्यासाठीही अधिकाधिक प्रोत्साहन देण्यात यावे.

मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, हाफकिन संस्थेसाठी वैद्यकीय शिक्षण संचालकांमार्फत लवकरच एमडी पॅथॉलॉजिस्टची नेमणूक करण्यात येईल. तसेच हाफकिन संस्थेने गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत घेतलेल्या निर्णयांना नियामक परिषदेने मंजुरी दिली आहे. याशिवाय या संस्थेतील मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि अधीक्षक ही पदे कंत्राअी पध्दतीने भरण्यास परवानगी देण्यात आली आहे.याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हाफकिन संस्थेतील एकूण 14 निवासी/ अनिवासी इमारतींच्या सुरु असलेल्या दुरुस्ती कामांना गती देण्यात येणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.