Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चक्क रस्त्यावरच वाघाने हल्ला चढवून महिलेला केले ठार

मृतक महिला मार्निंग वाकला गेले असता वाघाने केला हल्ला. वन विभाग आणि नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि. १६ डिसेंबर : आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास पोंभूर्णा-वेळवा मार्गावर मार्निंग वाकला गेलेल्या एका ३५ वर्षीय महिलेवर पट्टेदार वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाघाचे हल्ले वाढतच असून आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास वेळवा येथील रहिवासी ३५ वर्षीय संध्या विलास बावणे ही नेहमीप्रमाणे मार्निंग वाकला गेली होती,आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास पोंभुर्णा-वेळवा मार्गावर पोंभुर्णा पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पुलाजवळ दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला चढवून ठार केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लोकांनी आरडाओरडा केले असता. वाघाने संध्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात सोडून पळ काढला.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही; शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला धक्का; ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.