Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला धक्का; ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली. राज्य सरकारची इम्पेरिकल डेटा देण्याची मागणी या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वृत्तसंस्था, १५ डिसेंबर : ओबीसी आरक्षणाच्या  मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. केंद्र सरकारने इम्पेरिकल डेटा देण्याची मागणी राज्य सरकारने केली होती मात्र, सुप्रीम कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली आहे.

ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला धक्का बसला. कारण जाहीर झालेल्या निवडणुका स्थगित करायला कोर्टानं नकार दिलाय. उलट ह्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश दिलेत. म्हणजेच महाराष्ट्रात २१ डिसेंबरला ज्या नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्या ठरल्याप्रमाणेच होणार आहेत. तर उर्वरीत निवडणुकांबद्दलचा निर्णय हा नव्या वर्षात म्हणजेच १७ जानेवारीला घेतला जाईल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

२७ टक्के ओबीसी आरक्षण जागा खुल्या प्रवर्गासाठी म्हणून नोटीफाय करा

विशेष म्हणजे निकाल देताना, सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश दिलेत की, २७ टक्के ओबीसी आरक्षण जागा ह्या खुल्या प्रवर्गासाठी म्हणून नोटीफाय करा आणि ह्या २७ टक्के आणि आधीच्या ७३ टक्के जागांवरचा निकालही एकाच दिवशी लावला जावा. म्हणजेच ओबीसी आरक्षणाशिवाय ठरलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याचा आदेश निवडणूक आयोगाला कोर्टानं दिलेला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राज्य सरकारची काय मागणी होती?

राज्य सरकारच्यावतीनं सुप्रीम कोर्टा हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. त्या याचिकेत निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे स्थगित करण्यात यावी, तसा आदेश सुप्रीम कोर्टानं द्यावा अशी मागणी सरकारनं केली होती. पुढच्या सहा महिन्यांसाठी निवडणूका पुढे ढकला, राज्य सरकारला इम्पेरीकल डाटा गोळा करण्यासाठी वेळ द्या. त्यासाठी राज्य सरकार आकाश पाताळ एक करेन, पण ह्या निवडणूका पुढे ढकला असं राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात मागणी केली होती. पण जस्टीस ए.एम.खानविलकर आणि जस्टीस सीटी रवीकुमार यांनी राज्य सरकारची मागणी फेटाळत निवडणूका ओबीसींशिवाय घेण्याचे आदेश दिलेत. ह्या निवडणूका नगरपंचायतीच्या आहेत.

सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारने द्यावा अशी माघणी राज्य सरकारने केली.

मात्र, इम्पेरिकल डेटामध्ये त्रृटी असल्याने तो देता येणार नसल्याचं केंद्राने म्हटलं.

केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला.

मग सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळली

आज कोर्टाने काय निर्णय दिला?

१. २७ टक्के ओबीसी आरक्षणाच्या जागा खुल्या प्रवर्गात करून निवडणुका घ्या

२. सगळ्या निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी द्या

३. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळली

४. निवडणुका स्थगित करण्याची आणि पुढे ढकलण्याची याचिका फेटाळली

५. निवडणुकांबाबत पुढील सुनावणी १७जानेवारीला

६. निवडणूक आयोगाना निवडणुकीबाबत अध्यादेश काढावा

७. १०५ नगरपंचायती आणि २ जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार

८. तीन महिन्यात इंपेरिकल डेटा गोळा करण्याची सरकारची कोर्टात माहिती

९. आगामी निवडणुका आरक्षणाशिवाय होणार

१०. तीन महिन्यात राज्याने डेटा गोळा करावा-फडणवीस

हे देखील वाचा :

७ वर्षीय चिमुकलीवर ५४ वर्षीय म्हाताऱ्यांने केला अत्याचार!

दिवसाढवळ्या भररस्त्यात तरुणाची केली निर्घुण हत्या! 

 

 

 

Comments are closed.