Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वैरागड येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

आरमोरी दि १२ डिसेंबर : माजी राज्यमंत्री आ. धर्मरावबाबा आत्राम व जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी गडचिरोली जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेसची मोटबांधनी सुरू केली असून भाजपाचे जेष्ठ नेते नाना नाकाडे, काँग्रेसचे युवा नेते तथा चामोर्शी नगरपंचायतीचे माजी उपाध्यक्ष राहुल नैताम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर आता आरमोरी तालुक्यातील महत्वाचे ठिकाण असलेल्या वैरागड येथील कार्यकर्त्यांनी आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार्या मध्ये वैरागड येथील युवा नेते कविश्वर खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते उमाकांत सहारे, युवा नेते हितेश कुलसंगे, मंगेश सरकार यांचा समावेश आहे. वैरागड येथील कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे वैरागड मानापूर जिल्हा परिषद क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी मिळणार असून येत्या काळात मोठा राजकीय बदल घडून येण्याची शक्यता आहे

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा,

गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच नेचर सफारी चे उदघाटन

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हेलिकॉप्टर दुर्घटनेची सखोल चौकशी होणे आवश्यक – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

 

Comments are closed.