Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आई सप्तश्रृंगी मातेचे साधारण एक हजार वर्षापूर्वीचे मूळ स्वरूपाचे दर्शन ….

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नाशिक 29 सप्टेंबर :-  साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धे स्वयंभू असलेल्या सप्तश्रृंगी गडावरील मूर्तीचे संवर्धनाचे काम २१ जुलै पासून सुरू करण्यात आले होते व २६ सप्टेंबर रोजी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंदिर हे दर्शनासाठी भाविकांसाठी खुले करण्यात आले. मूर्तीचे संवर्धन करतेवेळी साधारण ३ फूट जाडीचा व २००० किलो शेंदूरचे कवच हे मूर्तीवरून काढण्यात आल्यामुळे आता देवीचे मूळ स्वरूप दिसू लागले आहे, जे अत्यंत मोहक व डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू केल्यानंतर शेंदुराचा लेप हा धार्मिक व शास्रोक्त पद्धतीने काळजीपूर्वक काढण्यात आला.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी येथे आई सप्तश्रुंगी देवीचे हुबेहूब मंदिराचे दृश्य साकारलेय कल्याणच्या ‘ मी कल्याणकर सामाजिक संस्था आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी. हा आईचा गड साकारलाय हे दृश्य पाहायला परीसरातील नागरिक गर्दी करत आहेत, येथील परिस्थितीचा आढावा घेऊन मंडळाचे अध्यक्ष नितीन निकम माजी नगरसेवक यांच्याशी बातचित बातमी आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.