Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

केंद्रीय मंत्र्यांच्या नावानं फेसबुक अकाऊंट उघडून अज्ञात ठग करतोय वसुली.

चालबाज ठगावर गुन्हा दाखल .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भिवंडी, 29, सप्टेंबर :-  केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नावाने अज्ञात ठग फेसबुकवर अकाऊंट उघडून त्याद्वारे अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैशांची मागणी करीत असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या वतीने भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात ठगा विरोधात सायबर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसापासून केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे नावाने फेक फेसबूक अकाऊंट उघडून, अज्ञात ठगाकडून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्या जात असल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. विशेष म्हणजे याच फेसबुक अकाऊंटवरून समोरच्या व्यक्तीला ऑनलाईन पैशांची मागणी केली जात आहे. अशाच एका तरुणाला मंत्री महोदयांच्या बनावट फेसबुक अकाऊंट वरून १५ हजार रूपयांची मागणी करण्यात आल्यानंतर हा प्रकार समोर आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे बनावट अकाऊंट कुणीतरी चालवत असल्याचा संशय आल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कार्यालयाकडून नारपोली पोलीस ठाण्यात सायबर गुन्ह्या अंतर्गत अज्ञात ठगावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, त्या बनावट फेसबुक अकाऊंटवरून आलेल्या रिक्वेस्ट कोणीही स्विकारू नयेत. तसेच कोणीही पैसे पाठवू नयेत. आपल्याबाबतीत असा प्रकार झाला असल्यास, तातडीने केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हत्या आणि आत्महत्या प्रकरणातून बोईसर हादरले…

Comments are closed.