Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सेवा पंधडरवडा अंतर्गत मुंबई भाजपकडून १०० ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता

मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथून स्‍वच्‍छता अभियानाची सुरूवात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, दि. 29 सप्‍टेंबर :- छत्रपती शिवाजी महाराज पार्क मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि सावरकर स्मारक येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याची स्वच्छता करून मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी पुतळा स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. तसेच दोन्‍ही पुतळयांना पुष्‍पहार अर्पण करुन अभिवादन केले. तर पर्यटन व महिला बालकल्याण मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत गिरगाव चौपाटीवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली.

मुंबई १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत बूथ स्तरावर ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २ ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी या उपक्रमाची सांगता होणार आहे. महापुरुषांच्या पुतळ्याची स्वच्छता या अभिनव उपक्रमांतर्गत खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत बोरिवलीतील अटल स्मृती गार्डन येथे तर खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. आमदार सुनील राणे यांच्या उपस्थितीत बोरिवलीतील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे तर आमदार योगेश सागर यांच्या उपस्थितीत कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ, माजी नगरसेविका प्रीती साटम यांच्या उपस्थितीत चित्रनगरी(फिल्मसिटी) येथील श्री. दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्याची स्वच्छता आणि पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर दादर येथील दादासाहेब फाळके स्‍मारक्‍ येथे जिल्‍हा अध्‍यक्ष राजेश शिरवडकर यांच्‍या उपस्थितीत दादासाहेब फाळके यांच्‍या पुतळयांची साफसफाई करण्‍यात आली. धारावी मध्‍ये मणी बालन यांनी तर वांद्रे पश्चिम येथे नगरसेविका अलका केरकर यांच्‍या उपस्थिती स्‍वामी विवेकानंद यांच्‍या पुतळयाची साफसफाई करण्‍यात आली. मुंबईत प्रत्‍येक विभागत आमदार, नगरसेवक यांनी हा उपक्रम आज राबवून सुमारे 100 पुतळयाची साफसफाई आज करण्‍यात आली.

दरम्‍यान, याबाबत माहिती देताना आमदार अॅड आशिष शेलार म्‍हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला वाढ दिवस सेवा पंधरवडा साजरा व्‍हावा अशी इच्‍छा व्‍यक्‍त केली. त्‍यानुसार पक्षाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष जे. पी. नड्डा यांनी पंडित दिनदयाळ उपाध्‍याया यांच्‍या जयंतीपासून 2 आक्‍टोबर महात्‍मा गांधी यांच्‍या जयंती पर्यंत सेवा पंधरवडा साजारा करण्‍याचे निश्चित केले असून देशभर जनसेवा करुन आम्‍ही हा पंधरवडा साजरा करीत आहोत.त्‍यांतर्गत आम्‍ही आज महापरुषांची स्‍वच्‍छता आणि त्‍यांना अभिवादन हे अभियान राबविले त्‍याला मुंबईत उत्‍तम प्रतिसाद मिळाला. सेवा पंधरावडा अंतर्गत विविध आरोग्‍य शिबिरेही आयोजित करण्‍यात येत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सरस्वतीचे पूजन करुन भुजबळांचा निषेध करु
नवरात्रीच्या काळातच मां सरस्वती, मां शारदेच्या प्रतिमेवर छगन भुजबळ आक्षेप घेतात आणि पेग्विन सेनेचे प्रमुख त्याचा साधा निषेधही करत नाहीत. आम्ही, मां सरस्वतीचे पूजन करुन भुजबळांचा निषेध करु अशी तीव्र प्रतिक्रिया मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा अंतर्गत मुंबई भाजपाकडून १०० ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करण्यात आली.

हे पण वाचा :-

 

Comments are closed.