केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान प्रभाकर राजनकर यांचे आकस्मिक निधन
शहरातून देशभक्तीपर गितांच्या गजरात भारत माता की जय ,वंदे मातरम् घोषणेसह अंत्ययात्रा
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बुलडाणा डेस्क 10 फेब्रुवारी :- संग्रामपूर शहरातील रहिवाशी असलेले व सध्या पश्चिम बंगाल सिमेवर कार्यरत असणारे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान प्रभाकर शालीग्राम राजनकर वय ४०वर्षे यांचे आकस्मिक निधन झाले आणी त्यांचेवर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
संग्रामपूर येथील रहिवाशी प्रभाकर शालीग्राम राजनकर हे मार्च २०१मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात सेवेत रुजू झाले होते ते येत्या मार्च २०२१ ला सेवानिवृत्त होणार होते त्यांचा तेथे आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर पश्चिम बंगाल येथून त्यांचे शव प्रथम पूणे येथे विमानाने आला त्यानंतर रात्री उशीरा सीआरपीएफ दलाच्या ६जवानांनी प्रभाकर राजनकर यांचा मृतदेह संग्रामपूर येथे पोहचविला .
सकाळी शहरातून देशभक्तीपर गितांच्या गजरात भारत माता की जय ,वंदे मातरम् घोषणेसह त्यांची अंत्ययात्रा काढली असता शहरात ठिकठिकाणी महिलांनी गच्चीवरुन फुलांचा वर्षाव केला. राजनकर यांचे शेतात संग्रामपूर येथील तहसीलदार तथा परि.उपजिल्हाधिकारी कु.तेजश्री कोरे, ना.तहसीलदार विजय चव्हाण यांनी पूष्पचक्र अर्पण केले यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिकांच्या उपस्थितत सामुहिक राष्ट्रगीत होवुन स्व.प्रभाकर राजनकर यांच्या लहान मुलाने अग्नी दिला.
Comments are closed.