आधी लॉकडाऊन, मग चक्रीवादळ, नंतर अवकाळी पाऊस आणि आता शेतकरी आंदोलन तब्बल तीस कोटींचा फटका शेतकऱ्यांना बसला
व्हॅलेंटाईनडे तरी आपल्याला गुलाबी नोटा मिळवून देईल अशी अपेक्षा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांवर कोरोनाने संक्रांत आणलीये.
युकेत सुरु झालेलं इतर देशात सुरु होणारं लॉकडाऊन. यामुळं गुलाब उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलाय.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क 10 फेब्रुवारी:- मावळातील गुलाबाला परदेशात मोठी मागणी असते. पण यंदा कोरोनाने त्यांच्यावर संक्रांत आणलीये. पंधरा वर्षांपासून गुलाब शेती करणारे शेतकरी यांनी गेल्या वर्षी व्हॅलेंटाईनडे साठी तब्बल पाच लाख गुलाबाची निर्यात करत पंच्याहत्तर लाखांची उलाढाल केली होती. पण यंदा परदेशात अद्याप ही कोरोना थैमान घालतोय, परिणामी गुलाबाच्या मागणीत चाळीस टक्क्यांनी घट झालीये. शिवाय दरात कपात ही झालीये.
मावळ तालुक्यातील सव्वा दोनशे हेक्टर क्षेत्रावर गुलाब फुल बहरतो. म्हणूनच देशातील गुलाब फुलाच्या उत्पादनात मावळ तालुक्याचा पन्नास टक्के वाटा असतो. याच वाट्यातील पस्तीस टक्के फुलांची निर्यात एकट्या युकेत होते. मात्र सध्या तिथं कोरोनामुळं लॉकडाऊन सुरुये तर हॉलंड ही लॉकडाऊन होण्याची दाट शक्यता आहे. तसेच काही देशातील विमान सेवा ठप्प करण्यात आलीये. दुसरीकडे हवाई मालवाहतुकीच्या दरात चाळीस टक्क्यांनी वाढ झालीये. त्यामुळं यंदा गुलाब फुलाच्या मागणीत पन्नास टक्क्यांनी घट झालीये. परिणामी गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल तीस कोटींचा फटका सहन करावा लागेल, असा दावा केला जातोय.
Comments are closed.