Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात राखीव विलगीकरण कक्षाकरीता इमारती अधिग्रहीत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १६ एप्रिल: राज्यात कोरोना विषाणूमुळे (Covid १९) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी, गडचिरोली साथरोग अधिनियमाच्या नुसार सक्षम प्राधिकारी म्हणून गडचिरोली जिल्हयातील कोरोना विषाणूंचा संशयबाधित रूग्ण आढळल्यास त्यावर नियंत्रण होण्यास्तव अशा संशयबाधीत लोकांचे विलगीकरण करणेसाठी याद्वारे राखीव विलगीकरण कक्षाकरीता इमारती अधिग्रहीत केल्या आहेत.

यात शासकीय मुलींचे आश्रमशाळा अहेरी, एकलव्य स्कूल अहेरी, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेची नवीन इमारत कोरची, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चामोर्शी यांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, दीपक सिंगला यांनी निर्गमित केले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.