Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पंढरपूर मतदारसंघातील मतदारांच्या प्रवासाला अनुमती देण्याच्या सूचना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नंदुरबार, दि. १६ एप्रिल: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मतदारसंघाची पोटनिवडणूक १७ एप्रिल २०२१ रोजी होणार असून राज्याच्या इतर भागात असलेल्या पंढरपूर मतदारसंघातील मतदारांना मतदान करता यावे यासाठी १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेपासून १८ एप्रिल रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत प्रवास करण्यास अनुमती देण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिल्या आहेत.

राज्यातील इतर भागातील पंढरपूर मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव असलेले आणि वैध मतदान फोटो ओळखपत्र असलेले मतदार कोणत्याही वाहनाने मतदारसंघात आणि मतदारसंघातून नियेाजित ठिकाणी  प्रवास करू शकेल. सदर व्यक्तीस प्रवास करताना शासनाच्या  ‘ब्रेक द चेन’ आदेशात नमूद सुचनांचे पालन करावे लागेल, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी नंदुरबार यांनी कळविले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.