Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे झाले कोरोनामुक्त.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई २ नोव्हेंबर :-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजित पवार कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. २६ ऑक्टोबरला अजित पवारांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता ते बरे होऊन घरी जात आहेत. पुढचे काही दिवस ते घरी विश्रांती घेणार असल्याची माहितीही सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

सुनील तटकरे पण ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे.आता ते बरे होऊन घरी जात आहेत. पुढचे काही दिवस ते घरी विश्रांती घेणार आहे . कोरोनाच्या काळात अजित पवार सतत दौऱ्यांवर होते. विविध ठिकाणी भेटी, मंत्रालयातील बैठका तसेच अतिवृष्टीच्या काळात फटका बसलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी ते दौरे करत होते. याच दरम्यान त्यांना काहीसा थकवा जाणवत होता. त्यामुळे ते चार-पाच दिवस होम क्वारंटाइन झाले होते. त्यानंतर कोरोनाची चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अजित पवार याने उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा, प्रार्थना करणाऱ्या सर्वांसह राज्यातील जनतेचे उपमुख्यमंत्र्यांनी मानले जाहीर आभार.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.