Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्य सरकारतर्फे राज्यात बांधण्यात येणाऱ्या मुलींच्या सर्व वस्तीगृहाला यापुढे मातोश्री असे नाव देण्यात येणार-उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांची घोषणा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर डेस्क, दि. ५ फेब्रुवारी: राज्य सरकारतर्फे राज्यात बांधण्यात येणाऱ्या मुलींच्या सर्व वस्तीगृहाला यापुढे मातोश्री असे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज केली.

शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ तर्फे मुलींचे मातोश्री वस्तीगृहाचे लोकार्पण सोहळा प्रसंगी बोलत होते. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत,कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडी यांच्यासह शिक्षण विभागातील अनेक वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुलींचे वसतिगृह हे मायेची सावली देत असून यापुढे मुलींचे सर्व वस्तीगृहाला मातोश्री असे नाव देण्यात येईल. अशी घोषणा उदय सामंत यांनी केली, याशिवाय राज्य सरकारचा महत्वाचा पुरस्कार असलेला महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार गेल्या ५ वर्षांपासून देण्यात आला नाही. परंतु गेल्या ५ वर्षांपासून प्रलंबित हे पुरस्कार रामटेक येथेच पुढच्या महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात एकाचवेळी देण्यात येईल. अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठा चे राज्यात ४ उपकेंद्र स्थापन करण्यात येणार असून मंत्रिमंडळ बैठकीत याविषयी प्रस्ताव ठेवण्यात येईल अशी माहितीही यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. तर राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपूरात देशातील पहिले डॉ बाबासाहेब आंबेडकर पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस चा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.

Comments are closed.