Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

निवडणूका रद्द झालेल्या ग्रामपंचायतीसाठी नव्या कार्यक्रमानुसार १२ मार्चला मतदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई डेस्क, दि. ५ फेब्रुवारी: विविध कारणांमुळे निवडणूक रद्द केलेल्या नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) व कातरणी (ता. येवला), नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) आणि अहमदनगर जिल्ह्यातील वाकी (ता. जामखेड) ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी नव्या कार्यक्रमानुसार १२ मार्च २०२१ रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर साकत (ता. जामखेड) ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. २ साठी देखील त्याच दिवशी मतदान होईल. अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी दिली.

मदान यांनी सांगितले की, उमराणे, कातरणी आणि खोंडामळी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार होते; परंतु सदस्य व सरपंचपदांच्या लिलाव प्रकरणी या तिन्ही ठिकाणी निवडणूक रद्द करण्यात आली होती. त्याचबरोबर वाकी ग्रामपंचायतीची आणि साकत ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. २ मधील निवडणूक नि:पक्षपणे पार न पडल्यामुळे रद्द करण्यात आली होती. आता या सर्वांसाठी नव्या निवडणूक कार्यक्रमानुसार १६ ते २३ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील. त्यांची छाननी २४ फेब्रुवारी २०२१ रोजी होईल. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत २६ फेब्रुवारी २०२१ असेल आणि त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.