Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बिबट्या शेतात घुसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नांदेड : मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव शेतशिवारातील केशव किसनराव व्यवहारे यांच्या ऊसाच्या शेतात अचानक बिबट्या आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून दहशत निर्माण झाली असल्याने स्थानिक सरपंच शिवानंद पुयड यांनी शेतातील बिबट्याला जेरबंद करून जंगलात सोडून देण्याची मागणी वनविभागाला केली आहे.

केशव किसनराव व्यवहारे यांच्या ऊसाच्या शेताचा बाजूला रात्रीच्या वेळी नांगरणीचे काम चालू असताना अचानक ट्रॅक्टरच्या हेडलाईटच्या प्रकाशात उसाच्या फडातून बिबट्या येताना दिसला. लगेच बिबट्याही लाईटच्या प्रकाशामुळे अंग चोरून परत ऊसाच्या फडात निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शी प्रेम केदारे यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या घटनेची माहिती होताच सर्वत्र नागरिकांत चर्चा करीत असून शेतकऱ्यात बिबट्याची दहशत निर्माण झाली असल्याने शेतीच्या कामात खोळंबा होत आहे. याशिवाय गावातील आजूबाजूच्या परिसरात अनेक शेतकऱ्यांचे गुरे, जनावरे यांनाही बिबट्यामुळे धोका होऊ शकतो. त्यामुळे वेळीच वनविभागाने लक्ष घालून जेरबंद करण्याचे शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यातील हटणार लॉकडाऊन : मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा

भरधाव स्कारपीओ वाहनाने ४ वर्षीय चीमुकल्यास चिरडले

 

Comments are closed.