Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र कोअर कमिटी सचिव पदी गिरीष कोरामी यांची नियुक्ती.

संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी केली नियुक्ती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 22 ऑगस्ट :- पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सचिव पदी येथील गडचिरोली जिल्हाध्यक्ष गिरीष कोरामी यांची पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी गडचिरोली जिल्ह्याला अतिशय महत्वाची जबाबदारी देऊन नियुक्ती केली आहे.

गिरीष कोरामी हे सन 2017 पासून पोलीस बॉईज असोसिएशन गडचिरोली जिल्हाध्यक्ष या पदावर काम करत असून , त्यांनी आजपर्यंत गडचिरोली जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा केला आहे, तसेच गडचिरोली जिल्हा पोलीस दलातील अनेक पोलीस बांधवांच्या समस्या सोडवून दिल्या आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

संपूर्ण गडचिरोली जिल्हा पोलीस दलाला दीडपट वेतन,C-60 QRT SAG यांना 2 पट देण्यात यावे व इतर मागण्यांसाठी सुद्धा गिरीष कोरामी व त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री / उपमुख्यमंत्री / गृहमंत्री यांची भेट घेऊन या संधर्भात अनेक वेळा निवेदने दिली आहेत, त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी गिरीष कोरामी यांची महाराष्ट्र कोअर कमिटी सचिव पदी नियुक्ती केली आहे, व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत, त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

हे देखील वाचा ,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोलीत शाळकरी विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात

गाव पाड्यातील रस्ते मुख्य रस्त्याशी जोडले जाणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.