Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रवादी महिला काँग्रेस कोरची तालुकाध्यक्षपदी गिरजाताई कोरेटी यांची नियुक्ती…

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

कोरची, दि. ३० मार्च : राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस कोरची तालुकाध्यक्षपदी कोरची येथील सामाजिक कार्यकर्त्या गिरजाताई कोरेटी यांची नियुक्ती केली आहे. तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेस कोरचीचे माजी तालुकाध्यक्षा विजयाताई बोगा यांची नियुक्ती जिल्हा सचिव पदी करण्यात आली आहे..

गिरजाताई कोरेटी यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय माजी राज्यमंत्री आमदार धर्मरावबाबा आत्राम, जि. प. माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, प्रदेश संघटक सचिव युनूस शेख, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, ज्येष्ठ नेते नाना नाकाडे, आरमोरी विधानसभाध्यक्षा शिलाताई परसुरामकर,आरमोरी विधान सभा महिला निरीक्षक निशा ठाकरे जिल्हा उपाध्यक्षा वनमाला पुस्तोडे यांना दिले आहे. यावेळी शाहीनभाभी हकीम यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे व शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम व महिला संघटन वाढविण्याचे काम गिरजाताई करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

३३ लाखांचा गांजा केला जप्त; परराज्यातुन गांजा तस्करी करणा-या दोघांना ठोकल्या बेड्या

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.