Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

३३ लाखांचा गांजा केला जप्त; परराज्यातुन गांजा तस्करी करणा-या दोघांना ठोकल्या बेड्या

पोलिसांनी गांजा, वाहने असा ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला; चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाची मोठी कारवाई...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  

विशेष प्रतिनिधी : के. सचिनकुमार

चंद्रपूर, दि. २६ मार्च : परराज्यातुन गांजा तस्करी करणा-या दोन गांजा तस्करांना बेड्या ठोकून ३३ लाखांचा गांजा जप्त करीत चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. चंद्रपूर शहराच्या सीमेवरील चिचपल्ली गावाजवळ ही कारवाई करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी दोन वाहनेसुद्धा जप्त करण्यात आली आहेत. श्रीनिवास नरसय्या मिसिडी, शंकर बालय्या घंटा दोघेही राहणार करिमनगर, तेलंगणा अशी अटकेतील गांजा तस्करांची नावे आहेत. तर, अन्य फरार दोन तस्करांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातून चारचाकी वाहनाने चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गांजातस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यानंतर दोन पथके गठीत करून गडचिरोली जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांवर पाळत ठेवण्यात आली. चिचपल्ली गावाजवळ दोन वाहने थांबवून तपासणी केली. त्यात १२५ किलो गांजा आढळून आला. या गांजाची किमत ३३ लाखांच्या घरात आहे.

यावेळी श्रीनिवास नरसय्या मिसिडी, शंकर बालय्या घंटा या दोघांना ताब्यात घेण्यात आले. परंतु, अन्य दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी गांजा, वाहने असा ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.स्थानिक गुन्हे शाखेची ही सर्वात मोठी कारवाई आहे. त्यामुळे अवैध गांजातस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

हे देखील वाचा : 

ग्रामपंचायत समितीने केली दारू नष्ट; कायदेशीर कारवाईचा दिला इशारा

१८ वर्षाखालील मुलांना वाहन चालवायला दिल्याने पालकांवर होणार कारवाई?

केंद्र सरकारच्या पोषण अभियानांतर्गत पोषण पंधरवडा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत साजरा!

 

 

Comments are closed.