Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नवनीत राणा यांच्या तक्रारी वरून चार बड्या पोलीस अधिकाऱ्यांना लोकसभा सचिवालयाची थेट नोटीस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अमरावती, दि. ३० मार्चअमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह आणि माजी पोलिस उपायुक्त शशिकांत सातव  यांच्याकडून मिळालेल्या चुकीच्या वागणुकीबाबत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी संसदीय विशेषाधिकार समितीकडे दाखल केली होती. या तक्रारीवरून आता राज्यातील चार बड्या अधिकाऱ्यांना लोकसभा सचिवालयात हजर राहण्याचे आदेश  बजावण्यात आले आहे.

अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉक्टर सिंह यांच्या विरोधात खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या तक्रारीवरून महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे,  अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह आणि अमरावतीचे माजी पोलीस उपयुक्त आणि अमरावती जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत सातव यांना ६ एप्रिलला दुपारी तीन वाजता लोकसभा सचिवालयात हजर राहावे लागणार आहे. यासंदर्भात लोकसभा सचिवालयाचे उपसचिव बाला गुरुजी यांच्या स्वाक्षरीसह पत्र दिले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विदर्भातील शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळत नसल्याच्या निषेधार्थ खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांनी २०२० मध्ये ऐन दिवाळीत आंदोलन छेडले होते. त्यावेळी दोघांनाही पोलिसांनी आधी नजर कैदेत ठेवून नंतर पोलीस आयुक्तालयात नेले होते. त्यावेळी पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह आणि पोलिस उपायुक्त शशिकांत सातव यांनी चुकीची वागणूक देऊन खासदारांचा अवमान केल्याची तक्रार खासदार नवनीत राणा यांनी संसदेच्या विशेष अधिकार समितीकडे दिली होती.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राष्ट्रवादी महिला काँग्रेस कोरची तालुकाध्यक्षपदी गिरजाताई कोरेटी यांची नियुक्ती…

 

Comments are closed.