Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यपालांनी गोंडवाना विद्यापीठाचा स्टार्टअप संबंधी घेतला आढावा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ३० मार्च : राज्यपाल तथा कुलपती श्री. भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यातील ११ पारंपारिक विद्यापीठातील इनोव्हेशन ,इनक्युबेशन व लिंकेजेस विभागांच्या संचालकांसोबत नावीन्यपूर्ण संकल्पनांचा तसेच त्या माध्यमातून सुरु झालेल्या स्टार्टअपचा राजभवन येथे दि. २५ मार्च रोजी सादरीकरणाद्वारे आढावा घेतला. यावेळी मा. कुलपतींनी विद्यापीठाने नाविण्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्टार्टअप आणि उद्योजकतेला चालना देऊन विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढविण्यासाठी केलेल्या कार्याची समिक्षा केली.

गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्राचे वैशिष्ट्य असलेल्या वन व आदिवासी आधारभूत पार्श्वभूमीवर संचालक ननवसा, प्रा. मनिष उत्तरवार यांनी गौण वन उपज, ड्रोन सर्व्हेक्षण, पंचगव्य, वनौषधी, कृषी उपज व प्रक्रिया, रानभाज्या इत्यादी वर आधारित नवसंकल्पना प्रस्तुत करून गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रात उद्योजक निर्माण करणे सुरु असल्या बाबत अवगत केले. राष्ट्रीय शिक्षा नीती २०२० च्या अनुशंगाने गोंडवाना विद्यापीठ खऱ्या अर्थाने स्थानिक समाजाकरिता त्यांच्या गरजा ओळखून काम करीत आहे, असे गौरवोद्गार मा. कुलपती महोदयांनी व्यक्त केले व त्यासंदर्भात आपल्यास अजून भरपूर वाव आहे त्यामुळे अधिक प्रयास करणे गरजेचे आहे. असे मत व्यक्त केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी कुलपती महोदयांनी विद्यार्थी केवळ रोजगार मागणारे उमेदवार न होता रोजगार निर्माण करणारे उद्योजक व्हावे, असा आशावाद व्यक्त केला तसेच विद्यापीठांनी परस्परांकडून शिकावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नवनीत राणा यांच्या तक्रारी वरून चार बड्या पोलीस अधिकाऱ्यांना लोकसभा सचिवालयाची थेट नोटीस

राष्ट्रवादी महिला काँग्रेस कोरची तालुकाध्यक्षपदी गिरजाताई कोरेटी यांची नियुक्ती…

 

Comments are closed.