Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उदास आहात का?

मूड चांगला राहण्यासाठी काही उपाय

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मग serotonin या हार्मोनच्या अगदी थोड्या प्रमाणामुळे देखील चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलेल. कारण या हार्मोनमुळे चिंता कमी होऊन मूड चांगला होण्यास मदत होते, भूकेवर नियंत्रित येतं व आनंदी राहण्याचं उत्तेजन मिळतं. म्हणून जर उदास वाटत असेल तर मेंदूत हा हॅपी हार्मोन स्त्रवण्यासाठी खालील उपाय नक्की ट्राय करा.

◆ मसाज- घेतल्याने खूप मोकळं वाटतं. त्यामुळे प्रत्येकालाच मसाज घेणे आवडते. तसेच मसाज घेतल्याने serotonin च्या वाढीस चालना मिळते व त्यामुळे दुःख दूर होऊन प्रसन्न वाटतं, असे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

◆ दूध-पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी एक म्हणजे दुधात असलेल्या α-lactalbumin मुळे serotonin ची निर्मिती होते. α-lactalbumin युक्त कोणत्याही आहाराने मूड सुधारण्यास मदत होते.

◆ झोप-अपुरी झोप घेऊ नका. अभ्यासावरून असे सिद्ध झाले आहे, झोपेचा व serotonin चा संबंध असतो. त्यामुळे मूड चांगला ठेवण्यासाठी शांत आणि पुरेशी झोप घ्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

◆ हळद-मध्ये असलेल्या Curcumin यात अँटीडिप्रेसन्ट गुणधर्म असतात. म्हणून कोमट दुधात हळद घालून घेतल्याने चटकन मूड सुधारतो.

◆ काळामिरी-मध्ये Piperin नावाचे ऍक्टिव्ह कंपाऊंड असते. ते serotonin च्या निर्मितीस अडथळा आणणारे एंझ्याइम्स ब्रेक करते.

◆ व्यायाम- serotonin स्त्रवण्याचा उत्तम उपाय म्हणजे व्यायाम करणे. म्हणून नियमित व्यायाम करा आणि प्रसन्न रहा.

हे पण वाचा :-

भास्कर जाधवांची ही शेवटीची फडफड

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.