Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भास्कर जाधवांची ही शेवटीची फडफड

प्रविण दरेकरांचे टिकास्त्र

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 22 ऑक्टोबर :-  शिवसेना नेते आ. भास्कर जाधवांची ही शेवटीची फडफड आहे. चिपळूणमध्ये जाधवांची ज्योत विझवून टाकण्याचा निर्धार आज भाजप करत आहेत. जाधवांसारखी प्रवृत्ती वाढली तर इथले वातावरण खराब होईल. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी आपली राहिल तसेच भास्कर जाधवांचा सुर्यास्त जवळ आला आहे असे ही  प्रविण दरेकर बोलले. आ. वैभव नाईक यांचे कुडाळमधील हे शेवटचे वैभव आहे. आता कुडाळ विधानसभा मतदारसंघात भाजपच्या कमळाचे वैभव येईल असा विश्वास भाजपचे नेते आ. प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला. आ. दरेकर, आ. प्रसाद लाड व माजी खा. निलेश राणे यांनी यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, आ. भास्कर जाधव व आ. वैभव नाईक यांच्यावर टिकास्त्र सोडले.

कुडाळ येथे भाजपच्या वतीने शुक्रवारी आमचे संविधान आमचा अभिमान- संविधान समर्थन रॅली काढण्यात आली. कुडाळ भाजप कार्यालयाकडून ही रॅली अनंत मुक्ताई समोरील मैदानावर दाखल होताच या रॅलीचे सभेत रूपांतर झाले. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर भाजपा नेते, मुंबई बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रा. प्रविण दरेकर, आ. प्रसाद लाड, भाजप प्रदेश सचिव निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आ. प्रमोद जठार, जिल्हा बॅंक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, उपाध्यक्ष रणजीत देसाई, सरचिटणीस प्रभाकर सावंत, दत्ता सामंत, कुडाळ विधानसभा पक्ष निरीक्षक संजू परब, अशोक सावंत, राजू राउळ, संदीप कुडतरकर, सुदेश आचरेकर, प्रसन्ना देसाई, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, युवानेता विशाल परब आदि उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आ. दरेकर पुढे म्हणाले कि, उध्दव ठाकरे सरकार संविधानीला धरून वागेल का? याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आ. भास्कर जाधव, आ. वैभव नाईक यांच्यासाठी ही संविधान रैली नाही. संविधानाचा सन्मान करणारा हा मेळावा आहे. आमची रॅली विरोधकांना इशारा देण्यासाठी आहे. संविधानाने वेगवेगळ्या यंत्रणा निर्माण केल्या आहेत. सीबीआय, एनआयए, अॅन्टी करप्शन ब्युरो या यंत्रणा भाजपा ने तयार केलेल्या नाहीत. त्यामुळे विरोधकांनी भाजपवर आरोप करून नयेत. आ. वैभव नाईक तुम्ही इथल्या जनतेच्या घामाचा पैसा खाल्ला आहात, त्याचा हिशोब अॅन्टी करप्शन वसूल करणारच. आता चुकीला माफी नाही असे सांगत आ. वैभव नाईक यांच्यावर टिकास्त्र सोडले. आ. भास्कर जाधव यांनी कुडाळ येथील मेळाव्यात राणे पिता-पुत्रांवर टीका केली.

आ. प्रसाद लाड म्हणाले, आ. भास्कर जाधव व आ. वैभव नाईक यांचे नाव घेवून त्यांना मोठे करू नका. भारतीय जनता पार्टी उध्दव ठाकरे व भास्कर जाधव यांचा बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आ. वैभव नाईक यांची तक्रार करणारे आम्ही नव्हतोच. तक्रार झाल्यानंतर आ. वैभव नाईक चौकशीला का सामोरे जात नाहीत? 10 वर्षात 300 पट संपत्ती कशी वाढू शकते? असा सवाल करीत केंद्रीय मंत्री नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून ठाकरे सरकारने उचलले, तेव्हासुध्दा आणि आतासुध्दा भाजपा राणेंसोबत आहे. सिंधुदुर्गात आपल्याला भाजपची ताकद वाढवायची आहे. भास्कर जाधव यांच्यावर पुणे, नवी मुंबईत गुन्हे दाखल झाले आहेत. अजूनही गुन्हे दाखल होतील असे सांगत आ. जाधव व आ. नाईक यांच्यावर सडकून टीका केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

माजी खा. नीलेश राणे म्हणाले, कुडाळमध्ये चार दिवसांपूर्वी आ. वैभव नाईक यांनी अघोषित मोर्चा काढला. खरेतर आ. नाईक यांच्याकडे भ्रष्टाचार सापडला असल्यामुळे म्हणून त्यांची चौकशी लावली आणि ती चौकशी लावली म्हणून यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी कुडाळात मोर्चा काढण्यात आला. हे उध्दव ठाकरे सरकार नाही, हे शिंदे-फडणवीस यांचे कायद्याचे सरकार आहे. चिपळूणच्या आ.भास्कर जाधव यांना एक दिवस आपली ताकद दाखवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा पन यावेळी त्यांनी केला. मागील एका निवडणुकीत ज्यावेळी या भास्कर जाधवांकडे पैसे नव्हते तेव्हा हेच जाधव ना. नारायण राणेंकडे आपला ट्रॅक्टर घेवून आले आणि 15 लाख रूपये निवडणुकीसाठी घेवून गेले. त्यावेळी ना. राणे यांनी तुझा ट्रॅक्टर नको पण जिंकून ये असे त्यांना सांगितले होते. आता हेच जाधव ना. राणेंवर टीका करत आहेत. ना. राणेंनी आम्हाला शिकवलंय ‘जो काय हिसाब किताब करायचा, तो याच जन्मी करायचा’त्यामुळे आ. भास्कर जाधव यापुढे तोंडाला आवर घाला, असा इशारा नीलेश राणेंनी त्यांना दिला. आ. नाईक तुमच्यावर कारवाई होणार हे निश्चित आहे. सिंधुदुर्गातील 40- 50 टक्के लोक आ. वैभव नाईक यांचा बाऊ करत आहे. त्यांनी आमच्या राणे फॅमिलीच्या नावावर एक तरी रस्ता दाखवावा असे आवाहन केले. आ. वैभव नाईक हे शिंदे गटात कधी जातील हे समजणार पण नाही, असा टोला त्यांनी लगावला.

राजन तेली म्हणाले, आ. वैभव नाईक यांची संपत्ती 300 कोटींनी वाढली आहे, एसीबीच्या नोटीशीनंतर ते चौकशीला सामोरे जाणे आवश्यक होते पण ते जात नाहीत. ना. राणेंवर टीका करणारे भास्कर जाधव यांना पहिल्यांदा ना. राणेंमुळेच तिकीट मिळाले, त्याचा मी साक्षीदार आहे. दुसरीकडे ना. राणेंमुळेच भास्कर जाधव यांना मातोश्रीवर एन्ट्री मिळाली याचा कधीतरी जाधव यांनी विचार करावा असे सांगत आ.वैभव नाईक व खा. राऊत यांनी राजीनामा देवून निवडून यावे असे खुले आव्हान दिले. आता कुणी अंगावर आलं तर शिंगावर घेण्याची आमची तयारी आहे. त्यामुळे विरोधकांनी अंगावर येण्याची भाषा करू नये असा सूचक इशारा तेली यांनी दिला. प्रमोद जठार म्हणाले, उध्दव ठाकरे यांनी टीकाकार अंधारे बाईंना शिवतीर्थावर स्थान दिले म्हणजेच ठाकरेंची ही अधोगती सुरू झाली आहे. आता यापुढे शत-प्रतिशत भाजपसाठी सर्वांनी पुढे या, असे आवाहन केले. मेळाव्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मेळाव्या दरम्यान कडाक्याचे ऊन असल्याने अनेक नागरिकांनी सावलीचा आसरा घेण्याचा प्रयत्न केला.

हे पण वाचा :-

चंद्रपूरच्या दीपकची लंडनच्या जागतिक आंबेडकराईट परिषदेत छाप 

Comments are closed.