Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुख्यमंत्री शिंदे आणि आमदार सरनाईक यांच्यात तू तू…मै मै ? सूत्रांची माहिती

वादाचे कारण ओवळा-माजीवडा मतदार संघ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 30 सप्टेंबर :-  राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्याच गटातील आमदार प्रताप सरनाईक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ओवळा-माजीवाडा मतदारसंघामधून दोघांमध्ये वितृष्ट निर्माण झाली असल्याची माहिती मिळतेय.

प्रताप सरनाईक यांनी ओवळा-माजीवाडा मतदारसंघ भाजपच्या माजी आमदाराकरिता सोडावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रयत्नशील असल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर शिंदेंनी प्रताप सरनाईक यांच्यावर दबाव देखील टाकण्यास सुरूवात केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. शिंदेंची ही मागणी सरनाईकांना मान्य नसल्याने दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली असल्याची माहिती आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

धक्कादायक बाब म्हणजे नुकतेच प्रताप सरनाईक हे ईडीच्या ताब्यातून सुटले असं वाटत असताना, त्यांना पुन्हा एकदा ईडी चौकशीचा इशारा देण्यात आल्याचं सुद्धा वृत्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरनाईक यांचा ओवळा माजीवाड़ा मतदार संघ भाजपच्या माजी आमदाराला देण्यासाठी शिंदे प्रयत्नशील आहेत. त्यासाठी सरनाईक यांच्या निकटवर्तीयांना फोडण्यासाठी विविध आमिषे दाखवली जात आहेत.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.