Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

घाटात दरड कोसळल्याने सातारा-महाबळेश्वर वाहतूक बंद

प्रवाशांना दक्षता घेण्याचे स्थानिकांचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सातारा 30 सप्टेंबर :- सातारा जिल्ह्यातील केळघर घाटात दरड कोसळली आहे. यामुळे मेढा मार्गे महाबळेश्वर रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. वाहतुकदार, पर्यटकांनी याची नाेंद घ्यावी असे आवाहन स्थानिकांनी केले आहे.

सातारा जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी पाऊस झाला. जिल्ह्यातील सातारा, पाचगणी, महाबळेश्वर येथे सकाळच्या सुमारास पाऊस पडला हाेता. त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण हाेते. रात्री पुन्हा काही भागात पाऊस झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान आज (शुक्रवार) सकाळी केळघर घाटात दरड काेसळली. यामुळे सातारा मेढा मार्गे महाबळेश्वर रस्ता बंद झाला. नवरात्र निमित्त प्रतापगडला देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मेढा मार्गे महाबळेश्वरला जात असतात. या भागात दरड काेसळल्याने घाटातील वाहतुक पुर्णत: बंद करण्यात आली आहे. पर्यटक, भाविक तसेच वाहतुकदारांनी याची नाेंद घ्यावी असे आवाहन स्थानिक नागरिकांनी केले आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.